मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

या अभिनेत्रींना सोशल मीडियावर केलं गेलं लक्ष्य, ट्रोलर्सना अशाप्रकारे दिलं चोख उत्तर

या अभिनेत्रींना सोशल मीडियावर केलं गेलं लक्ष्य, ट्रोलर्सना अशाप्रकारे दिलं चोख उत्तर

चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील कलाकारांना अनेक वेळा सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंचा सामना करावा लागतो. यातील काही कलाकार हे अशावेळी उत्तर देणे योग्य समजतात तर काहीजण मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात.

चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील कलाकारांना अनेक वेळा सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंचा सामना करावा लागतो. यातील काही कलाकार हे अशावेळी उत्तर देणे योग्य समजतात तर काहीजण मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात.

चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील कलाकारांना अनेक वेळा सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंचा सामना करावा लागतो. यातील काही कलाकार हे अशावेळी उत्तर देणे योग्य समजतात तर काहीजण मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 17 ऑक्टोबर : चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील कलाकारांना अनेक वेळा सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलिंचा सामना करावा लागतो. अनेक वेळा सोशल मीडिया युजर्सकडून अगदी टोकाच्या प्रतिक्रिया येत असतात. यातील काही कलाकार हे अशावेळी उत्तर देणे योग्य समजतात तर काहीजण मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतात. कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागणं हे आता सामान्य झालं आहे. अमिताभ बच्चन पासून ते शाहरूख खान पर्यंत आणि सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा, स्वरा भास्कर, तापसी पन्नू, अनुष्का शर्मा अशा कलाकारांना अनेक वेळा टोकाच्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. यातील अनेक जणांनी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केले आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)नेहमी ट्रोल होत असते. आयएनएसशी बोलताना तिने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘मला जे पटतं ते बोलते. मी स्पॉन्सर्ड मतं मांडत नाही. एखाद्या महत्त्वाच्या विषयात मला मत व्यक्त करावंस गरजेचं वाटलं तर मी आवश्यक व्यक्त करेन.  प्रत्येकाने आपल्या विचारांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि तेच मी करते.’तुझ्या कुटुंबियांनाही याचा त्रास होतो का असा प्रश्न विचारल्यानंतर स्वराने असं उत्तर दिलं की, 'ट्रोलर्स असंच वागतात हे आम्हाला स्वीकारयला हवं. पण त्यामुळे माझे विचार मांडण्यापासून मला कुणी रोखू शकणार नाही.'

(हे वाचा-आशा नेगीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर या अभिनेत्रीला डेट करतोय रित्विक? PHOTO VIRAL)

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही सोशल मीडियावरील अशाच गैरवर्तनाविरोधात  'Ab bas' अशी मोहीम चालवत आहे. ऑगस्ट महिन्यात तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावरून तिने ट्विटरचा वापर थांबवला. तेवढं करून ती गप्प बसली  नाही, तिने ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला. तेव्हापासून सोनाक्षीने सोशल मीडियावरील छळाबाबत मोहीम सुरू केली आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आहुजाला (Sonam Kapoor Ahuja) सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणाबाबत (Sushant Singh Rajput Death Case) केलेल्या एका ट्वीटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याआधीही ती अनेकदा ट्रोल झाली आहे.  सुशांत प्रकरणात तिने असे म्हटले होते की, रिया चक्रवर्तीला अशा पद्धतीने बोल लावणे चुकीचे आहे. यावरून तिला सोशल मीडियावर शिविगाळ झाली, धमक्या आल्या. मात्र, तिने यावर प्रतिउत्तर दिलं. तिला शिवीगाळ करणाऱ्यांना अभिनेत्रीने सोशल मीडियावर चोख उत्तर दिलं होतं.

(हे वाचा-पृथ्वीवर अवतरला नयनरम्य स्वर्ग! रितेश देशमुखने शेअर केलेला VIDEO व्हायरल)

काही दिवसांपूर्वी बर्थडे सिलेब्रेशनमुळे अभिनेत्री निया शर्माही (Nia Sharma) देखील ट्रोल झाली होती. त्यावर तिने असे म्हटले की, ती सोशल मीडियाचा वापर तणावापासून दूर राहण्यासाठी, आनंदासाठी करते. 'मला लोकांबरोबर वाद घालायला किंवा निराधार वाद घालायला आवडत नाही', अशी प्रतिक्रिया नियाने दिली आहे.

साथ निभाना साथिया’ आणि ‘बिग बॉस 13’ फेम डेबोलिनाला (Devoleena Bhattacharjee) ऑनलाइन नकारात्मकतेचा सामना करावा लागला आहे. 'सिद्धार्थ शुक्ला आणिा शेहनाज यांच्यामध्ये झिरो केमेस्ट्री' असल्याच्या केलेल्या कमेंटवरून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिने असे म्हटले की यावेळी ट्रोलर्सनी तिच्या आईबाबही आक्षेपार्ह विधानं केली. याबाबत तिने असे म्हटले आहे की, 'या गोष्टींचा मला फरक पडत नाही. सोशल मीडिया Untrue आहे. कामातून नाव कमावणारे खरे स्टार्स असतात. सोशल मीडियावर मिळणारी प्रसिद्धी पैशांसाठी असेल. ट्रोल्सशी डील करणे माझ्यासाठी सोपे आहे, मी त्यांना हास्यास्पद मार्गे स्विकारते. रस्तावर भुंकणाऱ्या कुत्र्याला आपण थांबवू शकत नाही. त्याकडे दुर्लक्ष करतो. तसंच मी करते. खरंतर ते मला ट्रोल करून आणखी प्रसिद्ध करत आहेत.'

(हे वाचा-कंगनानंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र आणि महाराष्ट्र सरकार आमने-सामने)

लिपस्टिक अंडर माय बुरखा फेम अभिनेत्री अहाना कुमारने (Ahana Kumar) असे म्हटले आहे की,  'लोक इतरांना नकळत इतक्या वाईट गोष्टी कशा बोलू शकतात हे मला समजत नाही. यात काही शंका नाही की सोशल मीडिया अधिक टॉक्सिक बनत चालले आहे. लॉकडाउनने बर्‍याच लोकांना Toxic केले आहे. मी बर्‍याच लोकांना भयंकर कमेंट्स करताना पाहिले आहे.' लॉकडाऊन काळात अहानाला देखील ट्रोल केले गेले होते. अभिनेत्री मास्क घालण्याचे नाटक करत असल्याची टीका तिच्यावर करण्यात आली होती.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Television