मुंबई, 17 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ची मुलगी इरा खान (Ira Khan) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. इराने बॉलिवूडमध्ये एंट्री केली नसली तरी सोशल मीडियावर तिचे तगडे फॅन फॉलोइंग आहे. पण आमीर खानच्या या लाडक्या लेकीला अनेकदा ट्रोल देखील व्हावे लागले आहे. सोशल मीडियावर ती नेहमी तिच्या आयुष्यातील नवनवीन गोष्टी शेअर करत असते. पण इतर स्टार किड्स प्रमाणेत इराला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण अशावेळी इराने शांत न राहता सर्व ट्रोल्सना चोख उत्तर दिले आहे. इराने सरळ त्यांना धमकीच दिली आहे. काही दिवसांपूर्वी इराने नैराश्य (Depression) आणि मेंटल हेल्थसंदर्भात (Mental Health) एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये तिने मेंटल हेल्थ संदर्भात लोकांनी व्यक्त होण्याचे आवाहन केले होते. तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला पाठिंबा दिला होता. मात्र सेलिब्रिटींना ट्रोल करणाऱ्यांठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या अनेकांनी इराच्या पोस्टवर देखील द्वेषपूर्ण कमेंट्स केल्या. यावर इराने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट करत उत्तर दिले आहे. इराने या स्टोरीमध्ये असे म्हटले आहे की, ‘मेंटल हेल्थ पोस्टसाठी तुम्ही आणखी एकदा जर द्वेषपूर्ण किंवा असंबद्ध झालात, तर मी तुमची कमेंट डिलिट करेन. जर तुम्ही पुन्हा तसं वागलात तर मी तुमचा माझ्या पोस्टपर्यंतचा अॅक्सेसच बंद करेन.’ (हे वाचा- आशा नेगीबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर या अभिनेत्रीला डेट करतोय रित्विक? PHOTO VIRAL ) इराने काही दिवसांपूर्वी मेंटल हेल्थ संदर्भात एक पोस्ट केली होती. ज्यात तिने असे म्हटले होते की, “गेल्या 4 वर्षांपासून मी डिप्रेशनमध्ये आहे. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. माझी मानसिक अवस्था पहिल्यापेक्षा खूपच चांगली आहे”
दरम्यान इराच्या या व्हिडीओवरून नेहमीच नेपोटिझम (Nepotism) आणि स्टार किड्स बाबत भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने आमिरचे नाव न घेता त्यांच्या कुटुंबावर टीका केली होती. इरा खानच्या डिप्रेशनमागे आई-वडील असल्याचा अर्थ कंगनाच्या Tweet मधून सरळ निघत होता.
At 16 I was facing physical assault, was single handedly taking care of my sister who was burnt with acid and also facing media wrath, there can be many reasons for depression but it’s generally difficult for broken families children, traditional family system is very important. https://t.co/0paMh8gTsv
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 12, 2020
World Mental Health Dayz बद्दल इराने बोलताना तिचे विचार मांडले होते. पण त्यावेळी आलेल्या कमेंट्सना कंटाळून इराने ट्रोल्सना चोख उत्तर दिले आहे.