JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘फास्टर फेणे’ च्या दिग्दर्शकाचा नवा प्रयोग; आता थिएटर होणार ‘झोंबीमय’, पाहा TEASER

‘फास्टर फेणे’ च्या दिग्दर्शकाचा नवा प्रयोग; आता थिएटर होणार ‘झोंबीमय’, पाहा TEASER

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतला झोंबीवर आधारित हा पहिला चित्रपट ठरणार आहे.

जाहिरात

Zombiwali

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 फेब्रुवारी: मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हा नेहमीच आगळ्यावेगळ्या संकल्पनांवर चित्रपट बनवत असतो. 2008 पासून त्याने ही जी ‘ उलाढाल’ सुरू केली आहे ती सतरंगी रे, क्लासमेट, फास्टर फेणे, माऊली, द रायकर केस यानंतर आता एका वेगळ्याच विषयावर येऊन पोहचली आहे. आदित्य सरपोतदार आता हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येत असून ‘झोंबिवली’ असं त्या चित्रपटाच नावं आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतला झोंबीवर आधारित हा पहिला चित्रपट ठरणार आहे.

मुंबईच्या एका गजबजलेल्या उपनगराचा ताबा झोंबी मिळवतात आणि मग पुढे काय घडतं हे प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. टीझरमध्ये अमेय वाघच्या शानदार अभिनयाचं आणि त्याचसोबत हॉरर कॉमेडीची झलक पाहायला मिळते. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

(वाचा - Photo: करिनाला मिळाला डिस्चार्ज; पाहा तैमुर लहान भावाला घेऊन येतोय घरी )

संबंधित बातम्या

याआधी झोंबी सारख्या विषयावर हॉलीवूड, बॉलीवूड आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये बरेच चित्रपट बनले आहेत. हॉलीवूड मधला ‘World War Z’  आणि बॉलीवूड मधला ‘GO Goa Gone’ सारखे चित्रपट यासाठी प्रसिद्ध आहेत. आदित्य सरपोतदारचा हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीमधला असा पहिलाच चित्रपट असल्यामुळे सगळ्यांनाच याबद्दल खूप कुतूहल असून या चित्रपटाकडून सर्वाच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या