Photo: करिनाला मिळाला डिस्चार्ज; पाहा तैमुर लहान भावाला घेऊन येतोय घरी

Photo: करिनाला मिळाला डिस्चार्ज; पाहा तैमुर लहान भावाला घेऊन येतोय घरी

करिना कपूरला रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. यावेळी तैमुर आणि सैफ लहान बाळाला घरी नेण्यासाठी रुग्णालयात आले होते. यावेळचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई 23 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (kareena kapoor) हिच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. करिना आणि सैफ (Saif Ali Khan) यांना पूत्ररत्नाचा लाभ झाला आहे. दरम्यान नुकतीच करिनाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सैफ अली खान आपला मोठा मुलगा तैमुरसोबत (Taimur) करिनाला घरी नेण्यासाठी रुग्णालयात आला होता. यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लॉकडाऊनमध्ये करिना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करिना कपूर हिला काल रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 21 फेब्रुवारी रोजी करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करिनाने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे. 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर यावर्षी लॉकडाऊनमध्ये करिनाना प्रेग्नेंट होती.

एक प्लेट भेळपुरीसाठी 8 जणांमध्ये युद्ध; रिचानं शेअर केला थक्क करणारा VIDEO

दुसऱ्या बाळाचा जन्मानंतर करिना आणि सैफ नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे घर अधिक प्रशस्त असणार आहे. दुसऱ्या प्रेग्नेंसीदरम्यान अभिनेत्रीने आपल्या व्यावसायिक कमिंटमेन्टस् पूर्ण करीत होती. दरम्यान नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी कपूर कुटुंबीय सज्ज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबीय व मित्रमंडळींकडून करिनाने शुभेच्छा पत्र व भेटवस्तू येत होत्या. करिना आणि सैफ पुन्हा एकदा आई-बाबा झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Published by: Mandar Gurav
First published: February 23, 2021, 1:24 PM IST

ताज्या बातम्या