मुंबई 5 मार्च: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं व्यक्तीमत्व आजवर अनेक चित्रपटांमधून उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विवेक ओबेरॉय पासून महेश ठाकुर पर्यंत अनेक अभिनेत्यांनी मोदींना रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला. आता महाभारत या मालिकेत युधिष्ठीर साकारणारे अभिनेता गजेंद्र चौहान (Gajendra Chauhan) मोदींच्या रुपानं सिनेसृष्टीत पुनरागमन करत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘एक और नरेन’ असं आहे. (Ek Aur Naren) गजेंद्र चौहान (Gajendra Chauhan) यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या आगामी चित्रपटाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. (film inspired by PM Narendra Modi) या चित्रपटात नरेंद्र मोदी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांबद्दल सांगितलं जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दोन भागांमध्ये केली जाणार आहे. एका भागात स्वामी विवेकानंद यांचं कार्य दाखवलं जाणार तर दुसऱ्या भागात मोदी कशाप्रकारे विवेकानंदांच्या विचारांचं अनुकरण करतात याबाबत सांगितलं जाईल. गजेंद्र चौहान या चित्रपटात मोदींची भूमिका साकारणार आहेत.
हे वाचा - Mann Ki Baat : पंतप्रधानांनी व्यक्त केली ‘ही’ गोष्ट न शिकल्याची खंत सध्या या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मिलन भौमिक यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे. गेले वर्षभर ते मोदींच्या वैयक्तिक आयुष्यावर संशोधन करत होते. येत्या एप्रिल महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. अन् कोरोनाग्रस्त वातावरण जर सामान्य झालं तर येत्या सप्टेंबर महिन्यात चित्रपट प्रदर्शित होईल. अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.