JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अनुराग कश्यपच्या मुलीसाठी हा काळ कठीण; शेअर केला अनुभव, पाहा VIDEO

अनुराग कश्यपच्या मुलीसाठी हा काळ कठीण; शेअर केला अनुभव, पाहा VIDEO

“मला फार उत्साह वाटत नाही, मी सतत रडत राहते. आणि असं वाटत की माझ्या आयुष्याचा काही उद्देश्यचं नाही." आलियाने स्वत:च हा अनुभव मांडला. तर हा अनुभव शेअर करण्याच कारणही तिने सांगितलं,.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 एप्रिल : दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यपची (Anurag Kashyap) मुलगी आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सध्या एका वेगळ्या कठीन काळातून जात आहे. मानसिक तणावाचा ती सामना करत आहे. सोशल मीडियावर तिने तिचा हा वाईट अनुभव शेअर केला. मागील वर्षी ती कोरोना संक्रमित (corona positive) देखिल झाली होती. पण त्यानंतर ती डिप्रेशन (depression) मध्ये गेली होती. आलियाने स्वत:च हा अनुभव मांडला. तर हा अनुभव शेअर करण्याच कारणही तिने सांगितलं, आपण ज्या कठीण प्रसंगातून गेलो किंवा जात आहोत जर इतर कोणी अशाच परिस्थितीतून जात असेल तर त्यांनी तज्ज्ञांची मदत घ्यावी यासाठी मी हा व्हिडीओ बनवत आहे असं ती म्हणाली. आलियाने तिच्या युट्युब चॅनल वर हा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडीओत ती म्हणते, “मी नोव्हेंबर महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तेव्हा मी घरातच क्वॉरन्टाइन झाले होते पण त्यानंतर मी जास्त डिप्रेशन मध्ये गेले. माझ्या मानसिक आरोग्यावर त्याचा खूप परिणाम झाला ज्यातून मी अजूनही बाहेर येऊ शकले नाही. माझ्यासाठी हे सगळं फार विचित्र आहे. मी थेरेपी घेते किंवा काउंसिलिंग सेशन घेते त्यानंतर मला काही दिवस किंवा एखादा महिना बरं वाटायचं पण नोव्हेंबर महिन्यापासून हे फारच कठीण झालं आहे.”

“मला फार उत्साह वाटत नाही, मी सतत रडत राहते. आणि असं वाटत की माझ्या आयुष्याचा काही उद्देश्यचं नाही. जस की मला या जगात रहायचचं नाही. मला वाटतं मी इतरांवर ओझ आहे. माझ्या डोक्यातील हे सगळे नकारात्मक विचार खरे नाहीत पण मला असं जाणवत.” आलिया म्हणाली.

Fashion faceoff : नोरा फतेहीने या हॉलिवूड अभिनेत्रीला केलं कॉपी; Same to Same ड्रेसचे PHOTO व्हायरल

संबंधित बातम्या

पुढे आलियाने सांगितल नोव्हेंबर महिन्यानंतर तिला पॅनिक अटॅक्स येऊ लागले होते तिला दवाखाण्यात ऍडमिट करण्यात आलं होतं. तर तिचे आई बाबा तिला भेटायला युएस (US) ला आले होते. त्यानंतर तिला बरं वाटलं होत. पण मार्च महिन्यानंतर पुन्हा तिची स्थिती खालावली. व त्यानंतर “मी बेड वरून उठतही नव्हते, अंघोळही करत नव्हते तर खातपित ही नव्हते” अस ती म्हणाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या