मुंबई, 27 सप्टेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, करिश्मा प्रकाश, रकुलप्रीत सिंह, सीमॉन खंबाटा आणि जया शहा यांची एनसीबीने चौकशी केली. यानंतर त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा हे श्रद्धा कपूर आणि साराच्या चौकशीसाठी NCB इमारतीत होते. त्यांनी सारा अली खानला ड्रग्जसंबंधीच्या चॅटबद्दल अनेक प्रश्न विचारले. या चौकशीदरम्यान सारा बरीच नर्व्हस दिसत होती. तिच्याविरोधात बोट पार्टीतला एक VIDEO हा मोठा पुरावा मानला जात आहे. शिवाय NCB कडे सुशांत आणि तिच्याबद्दल माहिती देणारे काही हॉटेल मॅनेजरचे जबाब असल्याचंही समजतं. तर दुसरीकडे दीपिका पदुकोन ही तिच्या व्हायरल झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे अडचणीत सापडली आहे.
त्यानंतर आता एनसीबीने आणखी एक कारवाई केली असून अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, करिश्मा प्रकाश, रकुलप्रीत सिंह, सीमॉन खंबाटा आणि जया शहा या अभिनेत्रींचे फोन जप्त करण्यात आले आहे. त्यांच्या मोबाइल फोनमधून मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मोबाइल फोन ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी केलेले चॅट्स, ड्रग्ससंबंधित केलेल्या संभाषणाची तपास केला जाईल. यातून अनेक धागे-दोरे मिळू शकतात. अनेक घटनांमुळे मोबाइल फोन हा अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून समोर आला आहे. त्यामुळे यातून अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हे ही वाचा- फार्म हाऊसवर ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली…’, श्रद्धा कपूरचा मोठा खुलासा काल एनसीबीसोबत चौकशीदरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणने ड्रग चॅटची कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे तिने Coco क्लबसंदर्भातील बाब देखील मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 2017 चे हे चॅट होते, ज्यामध्ये कोको क्लबमध्ये भेटण्याबाबत भाष्य करण्यात आले होते. दीपिकाने या गोष्टी मान्य केल्या असल्या तरी ड्रग्जबाबत तिने अजून कोणते स्टेटमेंट दिलेले नाही. दीपिकाने असे म्हटले आहे की, आम्ही एखादी सिगरेट पितो पण ते खूप कॉमन आहे. दरम्यान दीपिकाने तिच्या मॅनेजर करिश्माबरोबर हे चॅट केले होते. त्या करिश्माची देखील वेगळी चौकशी सुरू आहे. दोघींना देखील वेगळ्या खोल्यांमध्ये बसवून चौकशी करण्यात आली. दीपिकाने हे मान्य केले आहे की जे ड्रग चॅट समोर आले आहे ते तिचेच आहे. पण चॅटमधून तिने Doob मागितले असल्याचे तिने म्हटले आहे. तिने असे म्हटले आहे की Doob म्हणजे ते एक प्रकारची सिगारेट पितात. मात्र तिने अनेक प्रश्नांची उत्तरं देण टाळलं आहे.