'फार्म हाऊसवर ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली...', पण स्वत: ड्रग न घेतल्याच्या वक्तव्यावर श्रद्धा कपूर ठाम

'फार्म हाऊसवर ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली...', पण स्वत: ड्रग न घेतल्याच्या वक्तव्यावर श्रद्धा कपूर ठाम

एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे की NCB च्या चौकशी दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने छिछोरे (Chhichhore ) सिनेमावेळी केलेल्या पार्टीबाबत माहिती दिली.

  • Share this:

मुंबई, 26 सप्टेंबर : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) यांच्या अडचणी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मध्ये समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये या अभिनेत्रींची नावे समोर आली आहे. यामध्ये रकुलची काल चौकशी झाली तर इतर तिघींची चौकशी एनसीबीकडून सुरू आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो करत असलेल्या या चौकशीमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

एनसीबीच्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे की या चौकशी दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने छिछोरे (Chhichhore ) सिनेमावेळी केलेल्या पार्टीबाबत माहिती दिली. एनसीबीच्या चौकशीमध्ये श्रद्धा कपूरने अशी माहिती दिली आहे की छिछोरेच्या पार्टीमध्ये ती पवना फार्म हाऊसवर गेली होती तेव्हा त्या पार्टीमध्ये तिने केवळ डान्स केला होता. तिने अशी माहिती दिली की तिने यावेळी ड्रग्ज घेतले नव्हते.

(हे वाचा-'माल' घेतला नाही मग 12 वकिलांचा सल्ला कशासाठी? शर्लिनचा दीपिकाला तिखट सवाल)

एनसीबीच्या प्रश्नांना उत्तरं देताना श्रद्धा कपूरने असे म्हटले की, ती छिछोरेच्या पार्टीमध्ये गेली होती. दुपारी 3 वाजताच्या सुमारास ते पवना फार्म हाऊसवर पोहोचले होते. तिने असे म्हटले की दुपारी जेवल्यानंतर ते आयलँडला पोहोचले होते. श्रद्धाने अशी माहिती दिली की तिथे ड्रग्ज आणि दारुची पार्टी झाली. रात्री उशिरापर्यंत म्यूझिक लावून त्याठिकाणी पार्टी करण्यात आली होती. तिने असे सांगितले की त्यावेळी अनेकांनी ड्रग्ज घेतले पण तिने ड्रग्ज घेतले नाहीत.

(हे वाचा-'...मला माहित नव्हतं याचा अर्थ ड्रग्ज घेणं होतो',विकी कौशलने केला होता हा खुलासा)

श्रद्धा कपूरने एनसीबीसमोर असे मान्य केले आहे की तिने सुशांतला कधी व्हॅनिटीमध्ये तर कधी सेटवर देखील ड्रग्ज घेताना पाहिले आहे. तिने असे म्हटले की, ती 6 विचित्र लोकांची ओळख पटवून देऊ शकते ज्यांनी पार्टीमध्ये भाग घेतला होता.

सारा-दीपिकाच्या चौकशीतही समोर आल्या धक्कादायक गोष्टी

NCB ने केलेल्या चौकशीत साराने आपण स्वतः ड्रग्ज घेत नाही, असं स्पष्ट केलं पण सुशांतबरोबरच्या रिलेशनशिपबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. सारा अली खानने NCB च्या चौकशीत 2018 मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आपण सुशांतबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबून केलं आहे. एवढंच नाही तर या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर सुशांतच्या केप्री हाऊस इथल्या घरात त्याच्याबरोबर राहायलाही सारा गेली होती.

(हे वाचा-मोठी बातमी! ते ड्रग चॅट दीपिकाचेच, अभिनेत्रीने स्वत: दिली कबुली पण..)

दीपिका पादुकोणची चौकशी NCB ने सुरू केली आहे. चौकशीसाठी आली तेव्हा दीपिका खूपच शांत आणि संयमी दिसत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. NCB ने ज्या whatsapp चॅटच्या आधारावर दीपिकाची चौकशी सुरू केली आहे. ते चॅट्स आपलेच असल्याचं दीपिकाने कबूल केलं आहे. पण ड्रग्ज घेण्याबाबत तिने अजून कोणते स्टेटमेंट दिलेले नाही

Published by: Janhavi Bhatkar
First published: September 26, 2020, 3:35 PM IST

ताज्या बातम्या