JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रजनीकांत यांना मिळालेल्या फाळके पुरस्काराबाबतच्या एका प्रश्नानं जावडेकर भडकले, म्हणाले...

रजनीकांत यांना मिळालेल्या फाळके पुरस्काराबाबतच्या एका प्रश्नानं जावडेकर भडकले, म्हणाले...

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांना दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke award) जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या घोषणेचं ‘इलेक्शन कनेक्शन’ असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 एप्रिल :  सुपरस्टार रजनीकांत  (Rajinikanth) यांना दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke award) जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. एखाद्या कलाकारानं  संपूर्ण आयुष्यभर जे योगदान चित्रपटसृष्टीला दिले आहे, त्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. रजनीकांत यांना हा पुरस्कार जाहीर होताच त्यांच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण त्याचवेळी या पुरस्काराच्या घोषणेचं ‘इलेक्शन कनेक्शन’ असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. रजनीकांत यांच्या राज्यात म्हणजेच तामिळनाडूमध्ये 6 एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार (Tamil Nadu Assembly Election 2021) सध्या अंतिम टप्प्यात आहे.  त्यामुळे या पुरस्कार घोषणेच्या टायमिंगचं ‘इलेक्शन कनेक्शन’ असल्याची चर्चा सुरु आहे. जावडेकर काय म्हणाले? केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी  मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर होण्याचा तामिळनाडू विधानसभा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीची  जवळपास 50 वर्षे सेवा केली आहे. त्यामुळे 2019 चा  दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. चित्रपट आणि राजकारण यांचा परस्पर संबंध लावणे योग्य नाही, असे जावडेकर यांनी सांगितले आहे.  ( वाचा :  Rajnikant यांनी पटकावला Dadasaheb Phalke पुरस्कार; मिळणार किती रुपयांचं बक्षिस? ) दादासाहेब फाळके पुरस्कार निश्चित करणाऱ्या पाच सदस्यीय निवड समितीमध्ये आशा भोसले, सुभाष घई, मोहनलाल, शंकर महादेवन आणि बिस्वजीत चटर्जी यांचा समावेश होता. कोरोना महामारीमुळे या पुरस्काराची घोषणा उशीरा करण्यात आली आहे. आता 3 मे रोजी रजनीकांत यांना हा पुरस्कार दिला जाईल. रजनीकांत राजकारणात येणार होते विशेष म्हणजे सुपरस्टार रजनीकांत हे स्वत: निवडणुकीच्या राजकारणात येणार होते. त्यांनी मागच्या वर्षी राजकीय पक्ष स्थापन करण्याची तयारी देखील सुरु केली होती. मात्र त्यानंतर कोरोनाचं कारण देत त्यांनी राजकारण प्रवेश करणार नसल्याचं जाहीर केलं. दादासाहेब फाळके पुरस्काराचं हे 51 वं वर्ष आहे. 1969 साली हा पुरस्कार सुरु करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 2018 साली दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या