मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Rajnikant यांनी पटकावला Dadasaheb Phalke पुरस्कार; मिळणार किती रुपयांचं बक्षिस?

Rajnikant यांनी पटकावला Dadasaheb Phalke पुरस्कार; मिळणार किती रुपयांचं बक्षिस?

दादासाहेब फाळके हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. भारतीय सिनेक्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंतांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

दादासाहेब फाळके हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. भारतीय सिनेक्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंतांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

दादासाहेब फाळके हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. भारतीय सिनेक्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंतांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 1 मार्च: भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं (Dadasaheb Phalke award) सन्मानित केलं जाणार आहे. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी ही महत्वाची घोषणा केली. भारतीय सिनेसृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. आपल्या सिनेसृष्टीत आजवर शेकडो महान कलाकार होऊन गेले आहेत. परंतु त्यापैकी मोजक्याच कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावरुनच या पुरस्काराचं महत्व आपल्या लक्षात येतं. परंतु प्रश्न असा की हा पुरस्कार कोणाला देतात? याची निवड कोण करतं? आणि पुरस्कार पटकावणाऱ्या व्यक्तीला काय बक्षिस मिळतं?

दादासाहेब फाळके हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. भारतीय सिनेक्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंतांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात 1969 साली करण्यात आली होती. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार दिला जातो. गेल्या 52 वर्षात या पुरस्काराच्या बक्षिसाचं स्वरुप अनेकदा बदलण्यात आलं आहे.

अवश्य पाहा - ‘अरे हा तर देसी बॅटमॅन...’; शाहिद कपूरचा अजब मास्क तुम्ही पाहिला का?

अवश्य पाहा - ‘माफ कर माझ्याकडून चूक झाली’; अक्षयनं मागितली नुसरतची माफी, कारण...

1969 ते 72 या काळात ढाल, शाल आणि रोख रुपये 11 हजार बक्षिस म्हणून दिलं जात होतं. पुढे 1973 ते 76 या कालावधीत सुवर्णपदक, शाल आणि रोख रुपये 20 हजार बक्षिस म्हणून दिलं जात होतं. 1977 ते 83 या काळात बक्षिसाची रक्कम वाढवून 40 हजार रुपये करण्यात आली. पुढे सुवर्णपदक रद्द करुन त्याजागी सुवर्णकमळ दिलं जाऊ लागलं. अन् आता 2006 पासून शाल, सुवर्णकमळ आणि रोख रुपये 10 लाख बक्षिस म्हणून दिलं जात आहे. बक्षिसाच्या रकमेपेक्षा पुरस्कार पटकावणाऱ्या कलाकाराला मिळणारी प्रतिष्ठा खूप मोठी असते. पाश्चात्य सिनेसृष्टीत ऑस्करचं जे स्थान आहे तेच स्थान भारतीय सिनेसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्काराचं आहे.

दादासाहेब फाळके कोण होते?

दादासाहेबांना भारतीय सिनेसृष्टीचे जनक असं म्हणतात. ते एक उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते. त्यांचं पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके असं होतं. पण लोक त्यांना दादासाहेब याच नावानं ओळखतात. त्यांनी लाईफ ऑफ जिझस ख्रिस्त हा मूकपट पाहिला आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या जन्माची तयारी सुरु झाली. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यावरही असाच चित्रपट बनवायचा या ध्यासानं झपाटून गेलेल्या दादासाहेबांनी परदेशी जाऊन चित्रपटनिर्मितीचं तंत्र शिकून घेतलं. परत आल्यावर प्रयोग म्हणून ‘रोपट्याची वाढ’ हा लघुपटही बनवला. त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघून पुढे ‘राजा हरिश्चंद्र’ या संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला बोलपट त्यांनी तयार केला.

First published:

Tags: Dadasaheb phalke award, Marathi entertainment, Prakash javadekar