JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'एक थी शेरनी और एक भेडियों का झुंड...', संजय राऊत यांच्या ट्वीटवर कंगनाची तिखट प्रतिक्रिया

'एक थी शेरनी और एक भेडियों का झुंड...', संजय राऊत यांच्या ट्वीटवर कंगनाची तिखट प्रतिक्रिया

तिच्या विरोधकांना उत्तर देण्यात अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) एकही संधी सोडत नाही. गेल्या काही महिन्यात कंगनाने तिच्यावर टीका करणाऱ्यांना सोशल मीडियावरच उत्तर दिले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 नोव्हेंबर: प्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेत्री कंगना रणौतविरोधात (Kangana Ranaut) मानहानीची तक्रार (Defamation Case) दाखल केली आहे. याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटवर कंगनाने चोख उत्तर दिले आहे. कंगनाने अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर जावेद अख्तर यांच्यावर आरोप केले होते. त्याला उत्तर देत जावेद अख्तर यांनी आता कोर्टामध्ये धाव घेतली आहे. यावर आता अभिनेत्री कंगना रणौतने देखील खास तिच्या शैलीत उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे कंगनाने संजय राऊत (Sanjay Raut) यांचे ट्वीट शेअर करत चोख उत्तर दिले आहे. अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘एक थी शेरनी….और एक भेड़ियों का झुंड’. जावेद अख्तर यांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले होते. त्यावर उत्तर देताना कंगनाने हे ट्वीट केले आहे. एकाच वेळी तिने संजय राऊत आणि जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला आहे. (हे वाचा- जेठालालचा हा प्रसिद्ध डायलॉग सापडला होता वादात, न वापरण्याची मेकर्सची ताकिद ) संजय राऊत यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये असे म्हटले होते की, ‘गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजनवर मानहानीकारक वक्तव्य केल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील अंधेरी याठिकाणच्या मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेटसमोर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.’

संबंधित बातम्या

कंगनाने एका मुलाखतीमध्ये हृतिक रोशन प्रकरणाबाबत असे म्हटले होते ती जावेद अख्तर यांनी तिला असे सांगितले होते की, ‘राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंब ही मोठी माणसं आहेत. जर तू त्यांची माफी मागितली नाहीस तर तू कुठे पोहोचू शकणार नाहीस. ते तुला तुरुंगात पाठवतील आणि तेव्हा तुझ्याकडे स्वत:ला इजा करून घेण्याखेरीज कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, तेव्हा तू आत्महत्येचा देखील विचार करशील.’ कंगनाने असे देखील म्हटले होते की जेव्हा तिने त्यांचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा जावेद तिच्यावर चिडले देखील होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या