JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मलायकाच्या Cooking Skills वर फिदा झाला अर्जुन कपूर, सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

मलायकाच्या Cooking Skills वर फिदा झाला अर्जुन कपूर, सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

मलायकाने अर्जुनसाठी जेवणाचा खास बेत केल्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडबरोबरच सोशल मीडियावरही होत असते. दोघेही सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहेत. दोन्ही कलाकार सातत्याने त्यांचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असतात. नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सध्या दोघेही गोव्यात असून एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. यावेळी काही फोटो देखील तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. त्यानंतर अलीकडेच तिने अर्जुन कपूरसाठी (Arjun Kapoor) जेवण देखील बनवलं होते. अर्जुन कपूर याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये याबाबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये काही पदार्थांच्या डिशेस दिसत आहेत. त्यासोबत त्याने शानदार कॅप्शनदेखील दिले आहे.‘जेव्हा रविवारी ती तुमच्यासाठी जेवण बनवते,’ असे कॅप्शन त्याने दिले आहे. मलायकाने अर्जुनसाठी तयार केलेले पदार्थ दाखवणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ मलायकानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. त्यासोबत तिने हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत. त्यामुळे मलायका आणि अर्जुन दोघांच्या चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूपच आवडला असून त्यावर चाहत्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

नुकतेच मलायका आणि अर्जुनने मलायकाची बहिण अमृता अरोरा हिच्याबरोबर गोव्यामध्ये नववर्ष साजरे केले. नव्या वर्षाच्या निमित्ताने याआधी मलायकाने नुकताच एक फोटो शेअर केला होता. यामध्ये  मलायका चंदेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली तर अर्जुनने पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये मलायकाने लिहिले होते, एक नवी सकाळ आणि एक नवा दिवस.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या