JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / B'day Special: 13 वर्ष मोठ्या नसीर यांच्या प्रेमात पडली अभिनेत्री, विवाहित असूनही केलं लग्न

B'day Special: 13 वर्ष मोठ्या नसीर यांच्या प्रेमात पडली अभिनेत्री, विवाहित असूनही केलं लग्न

Ratna Pathak Shah Birthday: रत्ना पाठक यांचा जन्म 18 मार्च 1957 ला झाला त्या आज 64 वर्षांच्या होत आहेत. जाणून घ्या त्यांच्या प्रेम कहाणीविषयी

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 मार्च: हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक असणाऱ्या रत्ना पाठक यांनी सिनेसृष्टीमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपली आई दीना पाठक (Deena Pathak) यांचा वारसा चालवत बॉलिवूडमध्ये सपोर्टिंग कलाकार म्हणून एक ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री म्हणजे रत्ना पाठक (Actress Ratna Pathak-Shah). रत्ना पाठक यांचा जन्म 18 मार्च 1957 ला झाला त्या आज 64 वर्षांच्या होत आहेत. त्यांच्याविषयीच जाणून घेऊया. रत्ना पाठक शाह यांनी ‘मंडी’, ‘मिर्च मसाला’, ‘अलादीन’, ‘जाने तू या जाने ना’, ‘गोलमाल 3’, ‘एक मैं और एक तू’, ‘खूबसूरत’ अशा अनेक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. 2017 मधील फिल्म ‘लिपस्टिक अंडर माई बुरखा’ साठी त्यांना फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळालं होतं. रत्ना यांची प्रेमकहाणीही विलक्षण आहे. रत्ना यांची 1975 साली ‘संभोग से संन्‍यास तक’ या नाटकावेळी नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची भेट झाली. हे नाटक ग्रेट दिग्दर्शक सत्यदेव दुबे (Director Satyadev Dubey) दिग्दर्शित करत होते. यादरम्यानच रत्ना-नसीरचं प्रेम जुळलं आणि रत्ना यांनी 13 वर्षांनी मोठ्या नसीरशी लग्न करायचा निर्णय घेतला. त्यावेळी नसीर यांचं लग्न त्यांच्याहून 16 वर्षांनी मोठ्या पाकिस्तानी नागरिक परवीन मुरादशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगीही होती तिचं नाव हीबा. रत्ना-नसीर यांचं प्रेम जुळल्यानंतर परवीन आपल्या मुलीसह इराणला गेली आणि या दोघांनी लग्न केलं. अशी ही प्रेम कहाणी. नसीर रत्ना यांची मुलं इमाद आणि विवान. हीबा नंतर येऊन नसीर यांच्यासोबतच रहायला लागली. विवान हा अभिनेता आहे. (हे वाचा- Birthday Special: शशी कपूर यांच्या एका डायलॉगमुळं या अभिनेत्रीचं संपलं करिअर ) प्रसिदध अभिनेत्री सुप्रिया आणि रत्ना या सख्ख्या बहिणी. सुप्रिया यांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रत्ना यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक उत्तम भूमिका केल्या आहेत. एखादी विनोदी भूमिका असो वा गंभीर भूमिका रत्ना ती अगदी उत्तम वठवतात. रत्ना यांनी या पुढेही प्रेक्षकांचं असंच सकस अभिनयाने मनोरंजन करत रहावं अशीच प्रेक्षकांची अपेक्षा आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या