JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कतरिना कैफही Corona positive; रिपोर्ट मिळताच सर्वात आधी केलं एक काम

कतरिना कैफही Corona positive; रिपोर्ट मिळताच सर्वात आधी केलं एक काम

कोरोना रिपोर्ट मिळताच अभिनेत्री कतरिना कैफने (katrina kaif covid 19 positive) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 एप्रिल : गेले काही दिवस दररोज सेलिब्रिटींना कोरोना झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दररोज एका तरी सेलिब्रिटीला कोरोनाची लागण होते आहे. आता कोरोना पॉझिटिव्ह सेलिब्रिटींच्या यादीत कतरिना कैफचा (Katrina Kaif tested Covid-19 positive) सुद्धा समावेश झाला आहे. कतरिनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हल आला आहे. कतरिनाने स्वतः याची माहिती दिली आहे. कतरिनाने आपल्या सोशल मीडियावर आपण कोरोनाग्रस्त असल्याचं सांगितलं. इन्स्टा स्टोरीजवर तिनं याबाबत माहिती दिली. कतरिना म्हणाली, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. मी लगेच स्वतःला आयसोलेट केलं आणि आता होम क्वारंटाइन राहणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सर्वकाही काळजी घेत आहेत, असं तिनं सांगितलं.

तसंच जो कुणी माझ्या संपर्कात आला आहे, त्यानेसुद्धा लगेच आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहनही तिनं केलं आहे. शिवाय तिच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तिच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचेही तिने आभार मानले आहेत. हे वाचा -  ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’; मास्कविना फिरणाऱ्या कंगनाला अभिनेत्याचे खडे बोल याआधी विकी कौशल आणि भूमी पेडणेकरही कोरोनाग्रस्त असल्याचं निदान झालं. विकी कौशलचं नाव कतरिनासोबत जोडलं जातं. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये विकीने कोरोना नियमांचं उल्लंघन करून कतरिनाच्या घरी जाऊन तिची भेट घेतल्याचंही समोर आलं होतं. मात्र विकीने ही अफवा असल्याचं सांगत हे वृत्त फेटाळून लावलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या