मुंबई, 5 एप्रिल – मुंबईत (Mumbai corona patients) दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन (weekend lockdown) देखील लावण्यात आला आहे. तर मास्क न घालणाऱ्यांवर महानगरपालिका कठोर दंड वसूल करत आहे. मास्क वापरा असं आवाहन अनेक सेलेब्रिटी करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर आवर्जून सांगत आहेत. पण अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) मात्र विना मास्क एका स्टुडिओ बाहेर दिसली.
View this post on Instagram
कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल होत आहे. हा VIDEO कसा आला? सुरुवातीला कंगनाने मीडियाला पोझ देण्यासही नकार दिला होता, पण नंतर ती तयार झाल्याचं दिसतं. स्टुडिओबाहेर आलेली असताना तिने मास्क घातलेला दिसत नाही. हा VIDEO पाहून टीव्ही अभिनेता सुयश रायने (Suyash Rai) लगेच कमेंट केली आहे.
याच व्हिडिओवर कमेंट करताना सुयश लिहितो, "जगाला ज्ञान द्यायला सगळ्यात पुढे येतात." 'मूर्खपणाचा कळस' असं त्याने म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये एका मागून एक सेलेब्रिटी हे कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) येत आहेत. नियमांचं पालन करूनही कलाकार पॉझिटिव्ह येत आहेत. आणि अशातच कंगना मुंबईच्या एका डबिंग स्टुडिओबाहेर विना मास्क स्पॉट झाली आहे.
दिशा पटानी कशी झाली इतकी Fit & Fine; सांगितलं आपल्या Fitnessचं रहस्य
बॉलिवूड मधील तारा सुतारिया (Tara sutaria), आलिया भट्ट (Alia bhatt), भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar), विक्की कौशल (Vicky kaushal), मोनालिसा, गायक बप्पी लहरी, अभिजीत सावंत (Abhijit sawant) कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तर टीव्ही आणि वेब विश्वातील ऋत्विक भौमिक, कनिका मान, राजवीर सिंह, शुभांगी अत्रे हे कलाकार कोरोना संक्रमित झाले आहेत.
अभिनेता सुयश राय ने केलेल्या कंमेटचीही चर्चा होत आहे. सुयश हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय अभिनेता आहे. तसंच एक्स Bigg Boss कन्टेस्टंट आहे. सुयश आणि अभिनेत्री किश्वर मर्चंट (kishwar merchant) हे पती पत्नी आहेत. किश्वरीनेही यावर कमेंट करत कंगनावर तोंडसुख घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Kangana ranaut