मुंबई, 31 मार्च- बॉलीवूडमध्ये (bollywood) दररोज कोणत्या ना कोणत्या कलाकारांच्या नात्याच्या आणि दुराव्याच्या बातम्या समोर येतं असतात. त्यांची अनेक प्रेमप्रकरणं (lovestory) सुद्धा बरीच चर्चेत असतात. अभिनेता सलमान खानची (salman khan) सुद्धा प्रेमप्रकरणे बॉलीवूडमध्ये बरीच चर्चेत राहिली आहेत. सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण सलमान खानची जुनी प्रेयसी(ex girlfriend) सोमी अलीनं(somi ali) सलमानवर धोका दिल्याचा धक्कादायक आरोप लावला आहे. सोमी अली ही एक अभिनेत्री आणि मॉडेलसुद्धा होती. ती मूळची पाकिस्तानची आहे. सोमीनं वयाच्या सोळाव्या वर्षी सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ (maine pyar kiya) हा चित्रपट पहिला होता. आणि त्यांनतर ती सलमानच्या प्रेमात पडली होती. तिला सलमान खानसोबत लग्नं करायचं होतं. त्यामुळे ती भारतात यायची तयारी करू लागली. तिनं आपल्या आईलासुद्धा हे सांगितलं. मात्र तिनं आपल्या वडिलांना असं सांगितलं. भारतात असणाऱ्या आपल्या काही नातेवाईकांना भेटण्याची माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी मी भारतात जात आहे, असंही ती सांगते.
भारतात आल्यानंतर सोमीनं काही मॉडलिंगचे प्रकल्प केले आणि काही चित्रपटसुद्धा केले. त्यानंतर काही दिवसांनी तिची सलमान सोबत भेट झाली. आणि त्यानंतर या दोघांच्यात प्रेम-प्रकरण सुरु झालं होतं. त्यावेळी सोमी केवळ 17 वर्षांची होती. सलमान आणि सोमी तब्बल 8 वर्षे नात्यात होते. त्यानंतर ते दोघे विभक्त झाले. आणि मग सोमी परत युएसला परतली. सोमीनं वारंवार सलमान सोबत ब्रेकअप झाल्यानं आपण चित्रपटांना रामराम ठोकून परतल्याचं सांगितलं आहे. मात्र नुकताच सोमीनं एक खळबळजनक खुलासा केला आहे. एका मुलाखती दरम्यान सोमीनं म्हटलं आहे. की सलमान आणि तिला विभक्त होऊन तब्बल 20 वर्षांचा काळ लोटला आहे. आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलो आहोत. मात्र आम्ही नात्यात असताना सलमान मला धोका देत होता. त्यामुळे मी त्याच्यापासून विभक्त झाले होते. त्याचबरोबर सोमीनं म्हटलं आहे की तिनं गेल्या पाच वर्षांपासून सलमान सोबत संवाद साधलेला नाही. (**हे वाचा:** गायकाचा कार अपघातात मृत्यू; दोन दिवसांनी येतोय नवा अल्बम ) सोमी अली ही सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ती सध्या ‘नो मोअर टीअर्स’ या सामाजिक संस्थेशी संलग्नित आहे. मध्यंतरी सोमीने आपण लैंगिक शोषणाला बळी पडल्याचादेखील धक्कादायक खुलासा केला होता. सोमी या सामाजिक संस्थेसोबत लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना आधार देण्याचं काम करते. सोमी अलीनं चुप, अग्निचक्र, आंदोलन, यार गद्दार, तिसरा कौन, अंत, आओ प्यार करे अशा चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. सलमान सोबत विभक्त झाल्यानंतर मात्र तिनं चित्रपटसृष्टीलाही रामराम ठोकला.