जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / गायकाचा कार अपघातात मृत्यू; दोन दिवसांनी येतोय नवा अल्बम

गायकाचा कार अपघातात मृत्यू; दोन दिवसांनी येतोय नवा अल्बम

गायकाचा कार अपघातात मृत्यू; दोन दिवसांनी येतोय नवा अल्बम

अल्बमच्या प्रमोशनसाठी तो अमृतसर येथे गेला होता. तिथून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. परिणामी संपूर्ण संगीतसृष्टी सध्या शोकसागरात बुडाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 31 मार्च**:** संगीत क्षेत्राला हादरवणारी घटना घडली आहे. सुप्रसिद्ध गायक दिलजानचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे 3.45 वाजता ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे येत्या 2 एप्रिल रोजी दिलजानचा एक नवा म्यूझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या अल्बमच्या प्रमोशनसाठी तो अमृतसर येथे गेला होता. तिथून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. परिणामी संपूर्ण संगीतसृष्टी सध्या शोकसागरात बुडाली आहे. दिलजान हा एक प्रसिद्ध पंजाबी गायक होता. मिळालेल्या माहितीनुसार दिलजान करतारपूरचा राहणारा आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या दिलजाननं आपल्या प्रचंड मेहनत करुन प्रसिद्धीचं शिखर गाठलं. ‘सुरक्षेत्र’ या संगीत स्पर्धेतून दिलजान खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला होता. या शोचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये काही पाकिस्तानी गायकांनी देखील भाग घेतला होता. अन् या सर्व कलाकारांमध्ये दिलजीतनं आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर रसिकांचं मन जिंकलं होतं. अगदी आशा भोसले यांनी देखील त्याच्या गायन शैलीची तोंड भरुन स्तुती केली होती. अनेक वर्ष स्ट्रगल केल्यानंतर अखेर त्यानं स्वत:चा एक सोलो अल्बम तयार केला होता. या अल्बमचं नाव तेरे वरगे असं आहे. अन् या अल्बमच्या प्रमोशसाठीच तो अमृतसर येथे गेला होता. तिथून परतताना त्याचा काम आपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की जागीच त्याचा मृत्यू झाला. अवश्य पाहा - Karan Johar सैफ अली खानच्या मुलाला करतोय लॉन्च; या चित्रपटाद्वारे करणार पदार्पण

जाहिरात

जंडियाला गुरूजवळ ही दुर्घटना घडली. दिलजान यांची कार वेगात असल्याचं सांगितलं जातं आहे. अति वेगामुळे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार डिव्हायडरला जाऊन धडकली. घटनास्थळी दाखल असलेल्या लोकांनी दिलजानला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दिलजान त्यावेळी गाडीत एकटाच होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात