JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Home sweet Home… विरुष्काच्या दरवाजावर झळकलं वामिकाचं नाव; पाहा PHOTO

Home sweet Home… विरुष्काच्या दरवाजावर झळकलं वामिकाचं नाव; पाहा PHOTO

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या कामाबद्दल जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलसुद्धा होतं असते. अनुष्कानं अलिकडेच एका गोंडस मुलीला जन्म दिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 18 मार्च:  सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत राहणाऱ्या जोड्यांपैकी एक असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली. या दोघांच्या कामाबद्दल जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलसुद्धा होतं असते. अनुष्कानं लॉकडाऊन मध्ये आपण आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. तेव्हापासूनच अनुष्का पुन्हा चर्चेत आली होती. अनुष्काने प्रेग्नेन्सीमधील आपले अनेक फोटो चाहत्यांसाठी शेअर केले होते. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी महिन्यात अनुष्कानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिचं नाव वामिका असं ठेवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का विराटने सतत आपल्या पोस्टद्वारे आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. मात्र आपल्या 2 महिन्यांच्या मुलीला त्यांनी अद्यापही सोशल मीडियापासून लांब ठेवलं आहे. अनुष्का आणि विराटने मिळून हा निर्णय घेतला आहे.सध्या ही जोडी चर्चेत आली आहे ती या कारणाने सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका दरवाजावर असणाऱ्या नेमप्लेटचा आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये अनुष्का आणि विराटच्या नावासोबत चिमुकल्या वामिकाचंही नाव लिहिण्यात आलं आहे. अशा या आगळ्यावेगळ्या प्रयोगानं चाहतेदेखील भारावून घेले आहेत आणि आश्चर्यचकितसुद्धा झाले आहेत. (**हे वाचा:** राखी सावंतचा एक्सबॉयफ्रेंड पुन्हा चर्चेत; सर्वांसमोर लगावली होती कानाखाली ) भारतीय संघाचा कॅप्टन असणारा विराट कोहली सध्या भारतविरुद्ध इंग्लंड सीरीज मध्ये व्यस्त आहे. हे सर्व खेळाडू सध्या आपल्या घरापासून लांब असल्याने त्यांना ती जाणीव नं व्हावी यासाठी असे आगळेवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर अनुष्का आणि विराट प्रमाणे छोट्या वामिकाचीही धूम चालू आहे असचं म्हणावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या