मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राखी सावंतचा एक्सबॉयफ्रेंड पुन्हा चर्चेत; सर्वांसमोर लगावली होती कानाखाली

राखी सावंतचा एक्सबॉयफ्रेंड पुन्हा चर्चेत; सर्वांसमोर लगावली होती कानाखाली

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर एक नाव चर्चेत आलं होतं ते म्हणजे अभिषेक अवस्थी. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतसोबत असलेल्या आपल्या नात्यामुळे अभिषेक सतत चर्चेत राहत होता. अभिषेकचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 17 मार्च 1982 मध्ये झाला होता.

पुढे वाचा ...

मुंबई,17 मार्च :  काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर एक नाव चर्चेत आलं होतं ते म्हणजे अभिषेक अवस्थी (Abhishek Awasthi). बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतसोबत (Rakhi Sawant) असलेल्या आपल्या नात्यामुळे अभिषेक सतत चर्चेत राहत होता. अभिषेकचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 17 मार्च 1982 मध्ये झाला होता. अभिषेक हा अभिनेता होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईला आला होता. डान्सर, अभिनेता, कोरिओग्राफर असलेला अभिषेक आपल्या कामापेक्षा जास्त राखी सावंतसोबत असलेल्या आपल्या नात्यामुळे सर्वांच्या लक्षात राहिला आहे.

काही वर्षांपूर्वी अभिषेक नच बलिये या डान्स शो मध्ये झळकला होता. त्यात तो शेवटच्या 2 कन्टेस्टंट मध्ये पोहचला होता. मात्र त्यानंतरसुद्धा त्याचं करिअर फारसं बहरू शकलं नाही. मात्र तो राखी सावंतसोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता.  या शो दरम्यान राखी सावंत आणि अभिषेक प्रेमात पडले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र पाहण्यात येत होतं. अभिषेक राखीसोबत अनेक टीव्ही कार्यक्रमात सुद्धा सहभागी झाला होता. मात्र या नात्यातसुद्धा अनेक वाद-वाद असल्याचं समोर आलं होतं.

राखी सावंतनं अभिषेकला मीडियासमोर कानाखाली दिलं होत. त्यानंतर हे प्रकरण बरेच दिवस सोशल मीडियावर चर्चेत राहिलं होतं. अभिषेकनं राखीसोबत झालेला वाद मिटविण्यासाठी फुल घेऊन राखीच्या घरी पोहचला होता. मात्र सोबत त्यानं मीडियालाही नेलं होतं आणि हे बघून राखी त्यच्यावर भडकली होती आणि त्याला कानाखाली लगावल होतं. 3 वर्ष नात्यात एकत्र असणाऱ्या राखी आणि अभिषेक मध्ये हळूहळू वाद विवाद वाढत गेले आणि शेवटी ते एकमेकांपासून वेगळे झाले.

(हे वाचा: नाद नाही करायचा! राणादांच्या 'पाठकबाईं'चा ग्लॅमरस अंदाज... पाहा VIDEO)

अभिषेकनं आपल्या आयुष्यात पुढं जाण्याचा निर्णय घेत अंकिता गोस्वामी हिच्याशी लग्नंसुद्धा केलं आहे. अंकिताही राखीची सुद्धा मैत्रीण होती असं सांगण्यात येतं. नुकताच राखी सावंतनं बिग बॉस 14 मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये राखी सावंतच्या भावानं अभिषेक वर आरोप लावत म्हटलं होतं की त्यानं आपल्या प्रसिद्धीसाठी राखीचा वापर करून घेतला आहे. त्यानं राखीला फसवलं होतं. त्यामुळे हे नातं पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Rakhi sawant, Rakhi Sawant (TV Actor)