मुंबई, 08 ऑक्टोबर : अभिनेत्री रेणुका शहाणेंच्या वाढदिवशी त्यांच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. 07 ऑक्टोबर रोजी रेणुका शहाणेंनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये एक शुभेच्छा अत्यंत खास होती. ती म्हणजे रेणुका यांचे पती अभिनेता आशुतोष राणा यांची. आशुतोष राणा यांनी त्यांच्या आयुष्यात रेणुका शहाणे किती महत्त्वाच्या आहेत, हे या पोस्टमधून मांडलं आहे. आशुतोष राणा आणि त्यांच्या मुलांच्या आयुष्यात रेणुका यांचे किती महत्त्वाचे स्थान आहे हे त्यांनी या पोस्टमधून मांडले आहे. त्याचप्रमाणे रेणुका शहाणेंसाठी एक कविता देखील त्यांनी पोस्ट केली आहे. ही पोस्ट वाचून एखाद्या पत्नीला तिच्या वाढदिवशी नवऱ्याने अशीच काहीशी पोस्ट करून शुभेच्छा दिल्या पाहिजे असे नक्की वाटेल. सोशल मीडियावर सध्या आशुतोष राणा यांची पोस्ट खूप व्हायरल होत आहे. आज देखील अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ही पोस्ट शेअर करताना आशुतोष राणा यांनी रेणुका शहाणेंचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. यावर या दोन्ही कलाकारांचे चाहते आणि त्यांचा मित्रपरिवार खूप कमेंट्स करत आहेत. (हे वाचा- कंगना तिचे राष्ट्रीय पुरस्कार परत करणार? स्वरा भास्करला अभिनेत्रीचं प्रत्युत्तर) अभिनेत्री माधुरी दिक्षीतने देखील रेणुका शहाणेंसाठी एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये दोघीजणी ‘लो चली मैं’ या चाहत्यांच्या आवडीच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये माधुरीने असे म्हटले आहे की, ‘आपल्या आयुष्यभरासाठी पुरणाऱ्या खूप आठवणी आहेत. हम आपके है कौन पासून बकेट लिस्टपर्यंत- तुझ्याबरोबर वेळ घालवणे हा आनंददायी अनुभव होता. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि हे वर्ष सुखाचे जावो’.
रेणुका शहाणेंनी देखील यावर रिप्लाय करत माधुरीचे आभार मानले आहेत. या व्हिडीओवर देखील चाहत्यांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. यावेळी सर्वांना ‘हम आपके है कौन’ ची आठवण झाली आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे चाहते आजही तितकेच आहेत, ते सर्व कमेंट्स पाहून लक्षात येते आहे.