मुंबई, 08 ऑक्टोबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput case) एम्सच्या डॉक्टरांनी त्यांच्या अहवालात सुशांतची हत्या झाली हा दावा फेटाळला आहे. त्यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असे नमुद केले आहे. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) टीका केली आहे. तिने तिचे नाव न घेता कंगनाच्या पुरस्कार परत देण्याच्या वक्तव्यावरून टीका केली आहे. कोणत्याही टिकेला प्रत्युत्तर देण्यात कंगना अगदीच अग्रेसर आहे. स्वराच्या या टिकेला देखील तिने उत्तर दिले आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने तिच्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘आता तर सीबीआय आणि एम्स दोघांनीही असा निष्कर्ष काढला आहे की सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला आहे. काही लोकं सरकारला त्यांचे पुरस्कार परत करणार होते नाही का?’
Hey! Now thay both CBI and AIIMS have concluded that #SushantSinghRajput tragically died by suicide... weren’t some people going to return their government bestowed awards??? 🤔🤔🤔
— Swara Bhasker (@ReallySwara) October 7, 2020
यावर कंगनाने तिची जुनी मुलाखत शेअर करत असे म्हटले आहे की, ‘ही आहे माझी मुलाखत, जर स्मरणशक्ती कमजोर असेल तर पुन्हा पाहा, जर मी एकही खोटा आणि चुकीचा आरोप केला असेल तर मी माझे सर्व पुरस्कार परत करेन. हे एका क्षत्रियाचे वचन आहे, मी राम भक्त आहे, प्राण जाए पर वचन ना जाए, जय श्री राम’.
ये है मेरा इंटर्व्यू अगर याददाश्त कमज़ोर हो तो फिर से देखें, अगर मैंने एक भी झूठा या ग़लत आरोप लगाया हो, तों मैं अपने सारे अवार्डस वापिस कर दूँगी, ये एक क्षत्रिय का वचन है, मैं राम भक्त हूँ, प्राण जाए पर वचन ना जाए, जय श्री राम 🙏#KanganaAwardWapasKar https://t.co/j6H8zLsuEp
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 7, 2020
सध्या #KanganaAwardWapasKar हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. कंगनाने तिचे हे ट्वीट करताना देखील हा हॅशटॅग वापरला आहे. कंगना-स्वरामध्ये सुरू असलेल्या ट्वीटवॉरवर अनेकांनी कमेंट केली आहे. दोघींच्याही ट्वीट्सना हजारो रिट्वीट मिळाले आहेत.