JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / राहुल वैद्य आणि दिशा परमारने गुपचूप लग्न केलं? पाहा VIRAL PHOTO मागील सत्य

राहुल वैद्य आणि दिशा परमारने गुपचूप लग्न केलं? पाहा VIRAL PHOTO मागील सत्य

राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि दिशा परमार (Disha Parmar) दोघंही वधू-वराच्या वेशात दिसून आले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चंदीगड, 06 एप्रिल : बिग बॉस 14 चा (Big Boss 14) उपविजेता ठरलेला मराठमोळा गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि बिग बॉसमधील स्पर्धक दिशा परमार (Disha Parmar) हे दोघंही त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. ही जोडी कधी लग्न करणार याची उत्सुकता चाहत्यांना असतानाच चंदीगड विमानतळावरील (Chandigarh Airport) वधू-वराच्या वेशातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे त्यांनी गुपचूप लग्न केल्याच्या (Rahul Vaidya and Disha Parmar wedding photo) चर्चेला उधाण आलं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत राहुल आणि दिशा दोघंही वधू-वराच्या वेशात आहेत. दोघांनीही एकाच गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत. खरंच त्यांनी लग्न केलं की काय? याबाबत आता अखेर राहुल वैद्यनेच मोठा खुलासा केला आहे.

संबंधित बातम्या

राहुलने आपल्या सोशल मीडियावरील या फोटोमागील खरी कहाणी सांगितली आहे.  एका म्युझिक व्हिडिओच्या (Music Video) शूटिंगसाठी असा गेटअप केल्याचं राहुलनं इन्स्टाग्रामवर (Instagram) स्पष्ट केलं. इन्स्टाग्रामवरील या जोडीचे फोटो, व्हिडिओ यांना अल्पावधीतच हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हे वाचा -  लग्नानंतरही अजय देवगन महिमा चौधरीवर प्रेम करायचा?, अभिनेत्रीनं केला खुलासा गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार बिग बॉसच्या घरात या जोडीचं नातं जुळलं. चाहत्यांनाही त्यांच्यातील केमिस्ट्री आवडली. राहुल वैद्य यानं बिग बॉसच्या घरातच दिशाला प्रपोजही केलं होतं. त्यानंतर दिशा बिग बॉसच्या घरात राहुलला भेटायलाही आली होती. त्यामुळे लवकरच ही जोडी लग्न करणार असल्याची चर्चाही होऊ लागली होती. राहुलनंही बिग बॉस संपल्यानंतर, आपल्या लग्नाच्या नियोजनाबाबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या. लवकरच आम्ही लग्न करणार असून, लग्नाची तारीख नक्की करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यानं सांगितलं होतं. तसंच आपण दोघंही शांत स्वभावाचे असल्यानं आणि मी अनेक लग्नांमध्ये परफॉर्म केल्यानं मला अतिशय साधेपणानं लग्न करायचं आहे. नंतर सगळ्यांसाठी फंक्शन ठेवू, असंही त्यानं सांगितलं होतं. त्यामुळे ही जोडी कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. हे वाचा -  कतरिना कैफही कोरोना पॉझिटिव्ह; रिपोर्ट मिळताच सर्वात आधी केलं एक काम आता त्याच्या नव्या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगदरम्यानचे बिहाईन्ड द सीन्सही व्हायरल होत असून, राहुल आणि दिशा या दोघांचे फोटो, व्हिडिओ याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. एका व्हिडिओत राहुल आणि दिशा हातात हात घालून चालताना दिसत आहेत. यामध्ये दिशानं गुलाबी रंगाचा लेहंगा घातला असून, भारदस्त दागिने घातले आहेत. तिनं न्यूड (माफक) मेकअप केला असून, यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. राहुलही तिच्या लेहंग्याच्या रंगला साजेल अशा क्रीम रंगाची शेरवानीत असून, त्यानं गुलाबी रंगाची पगडी घातली आहे. वधूवराच्या या वेशात हे दोघेही अतिशय देखणे दिसत आहेत. त्यांची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे. त्यांचे हे फोटो, व्हिडिओ बघून चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं असून, त्यांच्या खऱ्याखुऱ्या लग्नाची प्रतीक्षा चाहत्यांना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या