Home /News /entertainment /

लग्नानंतरही अजय देवगण महिमा चौधरीवर प्रेम करायचा? अभिनेत्रीनं केला खुलासा

लग्नानंतरही अजय देवगण महिमा चौधरीवर प्रेम करायचा? अभिनेत्रीनं केला खुलासा

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि महिमा चौधरी (Mahima Chaudhry) यांच्यात प्रेम प्रकरण (Love Affair) सुरू असल्याच्या बातम्यांनी एकेकाळी बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता. याबाबत महिमाने स्वतः खुलासा केला आहे.

    मुंबई, 06 एप्रिल: दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 'परदेस' (Pardes) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी महिमा चौधरी (Mahima Chaudhry) एकेकाळची बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री मानली जायची. यशाच्या शिखरावर पोहचल्यानंतर कलाकारांबाबत अफवा पसरणं किंवा एखाद्या अभिनेत्यासोबत नावं जोडलं जाणं काही नवीन गोष्ट नाही. पण त्यावेळी अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि महिमा चौधरी यांच्यात प्रेम प्रकरण (Love Affair) सुरू असल्याच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे त्यावेळी अजय देवगनचं नुकतचं लग्न झालं होतं. आता याबाबत महिमाने स्वतः खुलासा केला आहे. अलीकडेच महिमा चौधरीनं पिंकविला या वेब पोर्टलाला मुलाखत दिली आहे. यावेळी तिने अजय देवगणसोबत नाव जोडल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. अजय देवगणसोबत प्रेमसंबंधाची चर्चा निव्वळ अफवा असल्याचं तिनं सांगितलं आहे. यावेळी तिने या 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचा एक किस्साही सांगितला आहे. 'दिल क्या करे' या चित्रपटात अजय देवगण आणि काजोलनं मुख्य भूमिका साकारली आहे. पण या चित्रपटात महिमानं एक छोटीशी भूमिका साकारली होती. या चित्रीकरणाच्या वेळी महिमानं दिग्दर्शकाला सांगितलं होतं की, क्लोज अप शॉट घेवू नको. कारण या चित्रपटाच्या शुटींगपूर्वी महिमा चौधरीचा एक अपघात झाला होता. या अपघातात तिच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी काचा घुसल्यानं जखमा झाल्या होत्या. या अपघातामुळं ती बराच काळ चित्रपटापासून दूर राहिली होती. महिमानं सांगितल्यानंतरही दिग्दर्शकानं महिमाचे क्लोज अप शॉट घेतले. ही बाब महिमाला समजल्यानंतर ती दिग्दर्शकावर चिडली. (हे वाचा- भयानक अपघाताने बदललं अभिनेत्रीचं आयुष्य, चेहऱ्यात घुसले होते काचांचे 67 तुकडे) यानंतर महिमा चौधरीची अस्वस्थता पाहता, अजय देवगणने तिला विचारलं तिला कारण विचारलं. यावेळी तिने क्लोज शॉटबाबत घडलेला किस्सा अजयला सांगितला. अजयला तिची काळजी वाटली. त्यामुळे त्यानेही महिमाची बाजू घेत, क्लोज अप शॉट न घेण्याची विनंती दिग्दर्शकाला केली. यानंतर दिग्दर्शकानं सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की, अजय देवगन महिमावर प्रेम करतो. दुसऱ्या दिवशी ही बाब सगळीकडे पसरली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ajay devgan, Bollywood News

    पुढील बातम्या