JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / एअरपोर्टवर चाहत्याने Kiss करतानाचा Video झाला होता व्हायरल, 2 दिवसांनी अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

एअरपोर्टवर चाहत्याने Kiss करतानाचा Video झाला होता व्हायरल, 2 दिवसांनी अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

बिग बॉस फेम अभिनेत्री अर्शी खानला (Arshi khan tested corona positive) कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 22 एप्रिल : देशभरात कोरोनाने (corona) थैमान घातलं आहे. चित्रपट तसेच टिव्ही विश्वातही कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रोज नवनवीन कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. तर आता बिग बॉस फेम अभिनेत्री अर्शी खान हिला (Arshi khan tested corona positive) देखील  कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच अर्शी मुंबई एअरपोर्ट वर स्पॉट झाली होती. आणि त्यावेळीच एअरपोर्टवर तिची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आता ती पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट देण्यात आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याची माहिती दिली.

विशेष म्हणजे अर्शी एअरपोर्टवर असताना काही चाहते तिच्यासोबत फोटो काढायला आले होते. तेव्हा तिने फोटो काढण्याची परवानगी दिली पण एका अतिउत्साही चाहत्याने अर्शीला किस करण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्शीच्या हाताचं चुंबन घेतलं (fan kissed Arshi khan on airport) त्यानंतर अर्शी देखील गोंधळून गेली होती. हा व्हिडीओ देखील सोशल मीडिया चांगलाच व्हायरल झाला होता.

बिग बॉस (Big boss) या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितक्याच लोकप्रिय शो मधून अर्शी खान हीला लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय तिच्या वक्तव्यांमुळे तसेच निरनिराळ्या सोशल मीडिया पोस्ट मुळे ती सतत चर्चेत असते. तसेच सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. (हे पाहा - गीताला नव्हत करायचं हरभजन सिंगशी लग्न; पाहा काय म्हणाली… ) बिग बॉसमध्ये कमाल केल्यानंतर आता ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘अर्शी का स्वयंवर’ (Arshi ka swayamvar) हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोमध्ये ती एका तरुणाला निवडेल अन् त्याच्यासोबत लग्न करेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या