गीताला नव्हत करायचं हरभजन सिंगशी लग्न; पाहा काय म्हणाली...

गीताला नव्हत करायचं हरभजन सिंगशी लग्न; पाहा काय म्हणाली...

एखाद्या हाय प्रोफाईल व्यक्तीला डेट करणं म्हणजेच स्त्रिचं करिअर खराब होण्यची शक्यता असते. हरभजनच्या पत्नी व्यक्त केल्या भावना.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : क्रिकेटपटू हरभजन सिंगची (Cricketer Harbhajan Singh) पत्नी अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) हीने हरभजन सोबत असलेल्या नात्यावर उघडपणे भाष्य केल आहे. तर आपण त्याच्या सोबत सिरिअस नसल्याचही तिने म्हटलं आहे. हरभजन सोबतची रिलेशनशिप फार कठीण असल्याचही तिने म्हटलं.

गीता ने एका मुलाखतीत यावर भाष्य करताना म्हटलं आहे की, एखाद्या हाय प्रोफाईल व्यक्तीला डेट करणं म्हणजेच स्त्रीचं करिअर खराब होण्यची शक्यता असते. तिने रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळाबद्दल सांगताना म्हटलं की कोणाशी तरी संबध असण त्या वेळी फार मोठी गोष्ट होती. तर एका मोठ्या अभिनेत्रीला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होत कारण तीने लग्न केलं होतं, निर्मात्यांना ती लग्नानंतर गर्भवती होण्याची भीती वाटत होती.

हे वाचा - मुलासोबत आक्षेपार्ह फोटो घेणं अभिनेत्रीला पडलं महागात, खावी लागली जेलची हवा

स्वत:च्या अनुभवाविषयी सांगताना गीता म्हणाली, माझ्या पहिल्या चित्रपटानंतर माझ्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. पण पुढे त्यांच काहीच झालं नाही. गीताने आपण हरभजन सोबतच्या रिलेशनशीप मध्ये सिरिअस होण्यास घाबरत होतो असही म्हटलं. क्रिकेटर्सचे अनेक मुलींसोबत संबध असतात अनेक गर्लफ्रेंड्स असतात अस गीताला वाटत होतं.

हे वाचा - पाकिस्तानी रॅपर आलियावर फिदा; समाज माध्यमांवर 'तो' VIDEO होतोय व्हायरल

पण अखेर 2015 मध्ये गीता आणि हरभजनने लग्नगाठ बांधली. तर त्यांना हिनाया हीर नावाची मुलगी देखिल आहे. 2016 मध्ये गीताने हीर ला जन्म दिला होता. तर आता हरभजन आणि गीता पुन्हा एकदा आई बाबा होणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

गीता सध्या चित्रपटसृष्टीपासून पुर्णपणे दूर असून ती पूर्णवेळ कुटुंबालाच देत आहे. तर सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. सतत निरनिराळे फोटोज आणि व्हिडीओस पोस्ट करत असते.काहीच दिवसांपूर्वी तिने प्रेग्नंसी योगाचे फोटो पोस्ट केले होते.

Published by: News Digital
First published: April 22, 2021, 11:19 AM IST

ताज्या बातम्या