JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ई-बाइकवरून आली वरात; पाहा जोडप्याचा Eco friendly विवाहसोहळा

ई-बाइकवरून आली वरात; पाहा जोडप्याचा Eco friendly विवाहसोहळा

दिल्लीच्या (Delhi) एका जोडप्याने मात्र आपल्या विवाहसोहळ्यातून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. आपल्या कृतीतून त्यांनी पर्यावरणाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 3 एप्रिल**:** गेलं वर्षभर देशभरात कोरोनाचं थैमान आहे. त्यामुळे सुरुवातीचे काही महिने लॉकडाउनमध्ये (Lockdown) गेले; मात्र ‘अनलॉक’ होऊ लागल्यानंतर हळूहळू सगळं सुरू झालं. त्यातच विवाहसोहळेही आले. अनेक जणांचे विवाह नेटक्या स्वरूपात, मोजक्या माणसांच्या उपस्थितीत झाले; पण माणसांच्या उपस्थितीचे आणि बाकी सगळे निर्बंध आहेत, असं म्हणतानाही अनेक ठिकाणी शाही विवाहसोहळे (Big Fat Indian Weddings) पार पडले. या पार्श्वभूमीवर, दिल्लीच्या (Delhi) एका जोडप्याने मात्र आपल्या विवाहसोहळ्यातून एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला. आपल्या कृतीतून त्यांनी पर्यावरणाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. आदित्य अगरवाल आणि माधुरी बालोदी असं या जोडप्याचं नाव. त्यांनी नुकतंच इको-फ्रेंडली सोहळ्यात (Eco-Friendly Wedding) लग्न केलं. माधुरी सोशल एंटरप्रेन्युअर (Social Entrepreneur) आहे. तिच्याच डोक्यातून ही इको-फ्रेंडली सोहळ्याची कल्पना आली आणि सात जन्म साथ देण्याची शपथ घेणार असलेल्या तिच्या जोडीदारानेही तिची ही कल्पना उचलून धरली. ‘मियाँ बिबी राजी तो…’ या म्हणीप्रमाणे उत्सवमूर्तींनीच कल्पना ठरवल्यामुळे बाकी कोणाचा काही प्रश्नच नव्हता.

अवश्य पाहा - आजार राहू दे पण इलाज आवर! Injection घेताना आजीबाईने दिली खतरनाक reaction, पाहा VIDEO नवरा मुलगा विवाहस्थळी येतो तो रथातून, घोड्यावरून, नाही तर कारमधून; पण 32 वर्षांचा आदित्य मात्र आला ‘युलु बाइक्स’च्या (Yulu Bikes) इलेक्ट्रिक बाइक्स घेऊन. विवाहस्थळी उभारण्यात आलेला मांडव, लावण्यात आलेल्या पताका आणि अन्य सुशोभीकरणासाठीही पुनर्वापर (Reused) केलेलं किंवा पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यात आलं होतं. या सोहळ्यात प्लास्टिकचं साहित्य कटाक्षाने टाळण्यात आलं होतं. सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) पाळलं जाण्यासाठी विवाहाला केवळ मोजक्या लोकांनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. वर-वधूंनी एकमेकांच्या गळ्यात घातल्या त्या माळा होत्या तुळशीच्या. विवाहाच्या आमंत्रणपत्रिकाही छापण्यात आल्या नव्हत्या. लग्नसमारंभाचे तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले.

अवश्य पाहा - अहो आश्चर्यम! गर्भावस्थेत असताना तिसऱ्या आठवड्यात पुन्हा गर्भधारणा आणि Super Twins ला दिला जन्म या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मिठाईऐवजी उपस्थितांना झाडांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं. सगळ्या पाहुण्यांनी नवपरिणित दाम्पत्यासाठी आणलेल्या भेटवस्तू वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून आणल्या होत्या. मोठमोठ्या विवाहसोहळ्यांचा खर्च 50 लाखांच्या घरात जातो. या इको-फ्रेंडली विवाहसोहळ्यासाठी केवळ दोन लाख रुपये खर्च आला. ‘लग्न म्हणजे आनंद आणि उत्सव. आनंदासाठी पैशांची गरज नसते,’ असं मत माधुरीने व्यक्त केलं. खर्चिक विवाहसोहळे म्हणजे पैशांचा अपव्यय, असंही ती म्हणाली, असं नॅशनल हेराल्डच्या वृत्तात म्हटलं आहे. ‘आम्ही निसर्गप्रेमी आहोत. सगळंच नवीन विकत घेण्यापेक्षा पुनर्वापर करण्यावर आमचा भर आहे. पर्यावरणाला हानी न पोहोचवता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आनंद मिळवायचा, अशी या सोहळ्यामागची कल्पना होती,’ असं माधुरी म्हणाली. ‘लोक या सगळ्याची टर उडवतील, अशी थोडी भीती पहिल्यांदा वाटली होती; पण सगळं चांगलं आणि ठरवल्याप्रमाणे झालं. सर्वांकडून कौतुकही झालं,’ असं मत आदित्यने व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या