लंडन, 2 एप्रिल: आपण बातमीचं हेडिंग पाहून बातमी वाचण्यासाठी आला तर तुम्ही जे वाचलंत ते अगदी खरं आहे. ब्रिटनमधील (Britain) एक महिला तीन आठवड्यांच्या गर्भावस्थेत (britain woman pregnant twice in third month gives birth to twins) असताना तिला पुन्हा गर्भधारणा झाली. त्यानंतर तिने जुळ्या मुलांना (twins) जन्म दिला आहे. मानवी जीवनात आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून असं पहिल्यांदाच घडलं आहे. ब्रिटनमध्ये राहण्याऱ्या रिबेका रॉबर्ट्सचं (Rebecca Robert) लग्न झाल्यापासून तिला बाळ होत नव्हतं. त्यामुळे तिचा पती राइस वीवर आणि ती चिंतेत होती. शेवटी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना फर्टिलिटी मेडिकेशन करण्याचा सल्ला दिला. उपचाराअंती रिबेकाला गर्भधारणा झाली. ही बातमी डॉक्टरांनी दोघांना सांगितल्यानंतर दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला. राइस रिबेकाची पहिल्या दिवसापासून काळजी घेत होता. रिबेकाला काय हवं नको यासाठी धडपड करत होता. तीन आठवड्यांनी पती राइस रिबेकाला डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन गेला. मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना रिबेकाला पुन्हा गर्भधारणा झाल्याचं समोर आलं. यामुळे डॉक्टरानाही कळेना नक्की असं का झालं. ही बाब डॉक्टरांनी या दोघांना सांगितल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं.
‘माझ्या गर्भात दोन मुलं वाढत आहेत हे डॉक्टरांना सांगितल्यानंतर मला आश्चर्य वाटले. दोन्ही मुलांमध्ये तीन आठवड्यांचं अंतर आहे. हे कसं झालं याबाबत डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत.’, असं रिबेकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. रिबेकाने आपला आनंद सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर लोकांनाही आश्चर्य वाटले.
अनेक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी हे अंत्यत दुर्मिळ घटना असल्याचा निष्कर्ष दिला आहे. गर्भात वाढण्याऱ्या दोन्ही मुलांमध्ये तीन आठवड्यांचं अंतर असल्याने औषधं कशी द्यायची असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. त्यामुळे विशेष काळजी घेऊन रिबेकाला औषधं दिली जात होती. काही आठवडे गेल्यानंतर गर्भातील लहान बाळ वाचेल की नाही याबाबत डॉक्टरांनी शंका उपस्थित केली होती. मात्र दैवी चमत्कार व्हावा तसं दोन्ही बाळ सुरक्षित जन्माला आली.
माणसालाही लाजवेल असं काम; हुश्शार कावळ्याचा VIDEO VIRALमागच्या सप्टेंबर महिन्यात रिबेकाने जुळ्या मुलांना जन्म दिला. रिबेकाने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर तीन आठवडे लहान असलेल्या मुलीली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. 95 दिवस तिची योग्य ती काळजी घेतल्यानंतर आता ती एकदम व्यवस्थित आहेत. रिबेकाची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स रिबेकाला भाग्यशाली असल्याच्या कमेंट्स देत आहे.