मुंबई 2 एप्रिल**:** निक्की तांबोळी (Nikki Tamboli) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं देखील चर्चेत असते. सध्या ती गायक टोनी कक्करमुळं (Tony Kakkar) चर्चेत आहे. निक्की टोनीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघांना अनेक सेलिब्रिटी पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं आहे त्यामुळं दोघं लवकरच लग्न करतील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या सर्व चर्चेवर अखेर स्वत: निक्कीनं प्रतिक्रिया दिली आहे. (Tony and nikki dating) निक्की सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नुकतंच तिनं आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह चॅट सेशन केलं होतं. यामध्ये तिनं आपल्या लव्ह लाईफबाबत खुलासा केला. एका चाहत्यानं तिला तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? असा सवाल केला होता. यावर निक्की म्हणाली, बॉयफ्रेंड म्हणजे काय असतं? तिचा हा खोडकर अंदाच चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. अवश्य पाहा - सोनम कपूरच्या गरुड अवताराची उडवली जातेय खिल्ली; अनोख्या फोटोशूटमुळं होतेय ट्रोल
अवश्य पाहा - ‘सलमान खान एक नंबरचा धोकेबाज’; अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप
टोनी कक्कर हा प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा भाऊ आहे. सध्या तो आपल्या गाण्यांमुळं चर्चेत असतो. येत्या काळात त्याचं निक्की तांबोळीसोबत एक नवं गाणं येणार आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी दोन्ही कलाकार रिलेशनशिपमध्ये असल्याचं नाटक करतायेत असंही म्हटलं जात आहे. अर्थात याबाबत टोनीनं अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.