मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सोनम कपूरच्या गरुड अवताराची उडवली जातेय खिल्ली; अनोख्या फोटोशूटमुळं होतेय ट्रोल

सोनम कपूरच्या गरुड अवताराची उडवली जातेय खिल्ली; अनोख्या फोटोशूटमुळं होतेय ट्रोल

नेटकरी हा नवा अवतार पाहून तिची जोरदार खिल्ली उडवत आहेत. (sonam kapoor trolled)  “काकी तुम्हाला फॅशन म्हणजे काय खरंच कळतं का?” अशा आशयाचे कॉमेंट्स करुन सोनमला ट्रोल केलं जात आहे.

मुंबई 2 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आपल्या अनोख्या फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. तिला बॉलिवूडची फॅशन क्वीन असंही म्हटलं जातं. मात्र ही फॅशनगीरी यावेळी तिच्या अंगाशी आली आहे. नेटकरी हा नवा अवतार पाहून तिची जोरदार खिल्ली उडवत आहेत. (sonam kapoor trolled)  “काकी तुम्हाला फॅशन म्हणजे काय खरंच कळतं का?” अशा आशयाचे कॉमेंट्स करुन सोनमला ट्रोल केलं जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

अवश्य पाहा - आदित्य नारायणनं सोडलं Indian Idol; यापुढे ‘हा’ अभिनेता करणार सुत्रसंचालन

सोनम सध्या हार्पर बझार इंडिया (Harper’s Bazaar India) या कंपनीची जाहिरात करत आहे. या कंपनीच्या मॅगझिन कव्हरवर देखील ती झळकत आहे. या मॅगझिनसाठी तिनं अलिकडेच एक फोटोशूट केलं होतं. त्यापैकी काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्या पैकी एक फोटो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या फोटमध्ये सोनमनं चक्क गरुडासारखा वेश परिधान केला आहे. तिचा हा गरुड अवतार पाहून काही नेटकऱ्यांची तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

अवश्य पाहा - ‘सलमान खान एक नंबरचा धोकेबाज’; अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

“ही कसली चादर लटकवली आहेस? काकी तुम्हाला फॅशन म्हणजे काय खरंच कळतं की उगाच काहीही घालून येताय अन् आम्हाला फॅशन म्हणून दाखवताय?” अशा आशयाच्या प्रतिक्रिया तिच्या या फोटोवर काही ट्रोलर्स देत आहेत. मात्र तिचा हा अवतार काही सेलिब्रिटींना आवडला आहे. त्यांनी सोनमव कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोनम आणि तिचा पती आनंद अहुजा गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये आहेत. सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे सोनमला तिच्या कुटुंबाची किती आठवण येते हे ती सांगत असते.

First published: