मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘सलमान खान एक नंबरचा धोकेबाज’; अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

‘सलमान खान एक नंबरचा धोकेबाज’; अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

“सलमान एक नंबरचा धोकेबाज आहे. संगीता बिजलानीसाठी त्यानं मला फसवलं” असा गंभीर आरोप तिनं केला आहे.

“सलमान एक नंबरचा धोकेबाज आहे. संगीता बिजलानीसाठी त्यानं मला फसवलं” असा गंभीर आरोप तिनं केला आहे.

“सलमान एक नंबरचा धोकेबाज आहे. संगीता बिजलानीसाठी त्यानं मला फसवलं” असा गंभीर आरोप तिनं केला आहे.

मुंबई 2 एप्रिल: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (salman khan) चित्रपटांबरोबरच अभिनेत्रींसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असतो. आजवर संगीता बिजलानी, कतरिना कैफ, ऐश्वर्या राय, लुलीया वंतूर (Sangeeta Bijlani, Katrina Kaif, Aishwarya Rai, Iulia Vantur) यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं आहे. या यादीत आता अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) हिचं देखील नाव जोडलं गेलं आहे. “सलमान एक नंबरचा धोकेबाज आहे. संगीता बिजलानीसाठी त्यानं मला फसवलं” असा गंभीर आरोप तिनं केला आहे.

सोमी अली ही मुळची पाकिस्तानी आहे. 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी ती भारतात आली होती. यादरम्यान तिला आलेले विविध अनुभव तिनं झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. लक्षवेधी बाब म्हणजे या मुलाखतीत तिनं सलमानसोबतच्या नात्यावरही भाष्य केलं. शिवाय सलमाननं मला फसवलं असाही आरोप तिनं केला.

अवश्य पाहा - सलमानचा राग अद्याप गेलेला नाही? विवेक ओबेरॉयला चित्रपटातून केलं बाहेर

ती म्हणाली, “सलमानसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते. मी त्याच्यासाठी खूपच पझेसिव्ह होते. कदाचित माझी हिच सवय त्याला आवडत नसावी. त्यामुळं अनेकदा तो माझ्यावर नाराजही होत असे. याच दरम्यान आमच्या आयुष्यात संगीता बिजलानी आली. अन् सलमानचं पूर्ण लक्ष तिनं वेधून घेतलं. तेव्हापासून सलमान सतत तिच्यासोबतच राहू लागला. मी सलमानवर खूप प्रेम केलं. पण त्याबदल्यात त्यानं माझा विश्वासघात केला. ब्रेकअपमुळं मी नैराश्येत गेले अन् कायमचं बॉलिवूड सोडून दिलं.”

अवश्य पाहा - कादर खान यांच्या मुलाचं निधन; एअरपोर्टवर करत होता सिक्युरिटीचं काम

सोमी अली ही 90 च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीनं  ‘बुलंद’, ‘अंत’, ‘यारा गद्दार’, ‘आओ प्यार करे’, ‘माफिया’, ‘चुप’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण तिच्या चित्रपटांना फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं निर्मात्यांनी देखील तिला चित्रपटात काम देणं थांबवलं. अखेर बेरोजगार झाल्यामुळं सोमी पुन्हा एकदा पाकिस्तानला परतली.

First published:

Tags: Marathi entertainment, Salman khan