JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शूटिंगला परतलेल्या अनुष्का शर्माचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

शूटिंगला परतलेल्या अनुष्का शर्माचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा कामावर परतली आहे. अनुष्का शर्माने जानेवारी महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर दोन महिने विश्रांती घेतल्यानंतर तिने शूटींगला सुरुवात केली आहे. याच दरम्यान अनुष्काने मागे केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मार्च : क्रिकेटपटू विराट कोहलीची (Virat Kohali) पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा कामावर परतली आहे. अनुष्का शर्माने जानेवारी महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर दोन महिने विश्रांती घेतल्यानंतर तिने शूटींगला (Shooting) सुरुवात केली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. मात्र असं असताना अनुष्काने मागे केलेल्या एका विधानाचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. ‘माझी लग्नाला सर्वात आधी प्राथमिकता असेल. तसंच मुलं झाल्यानंतर कदाचित लग्नानंतर काम करणार नाही’, असं अनुष्का व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

सिमी ग्रेवालने अनुष्काची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत तिने हे उत्तर दिलं होतं. तेव्हा सिमीने तिला लग्न तिच्यासाठी महत्त्वाचं आहे का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा अनुष्काने ‘लग्न माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी लग्न करु इच्छिते. मुलांना जन्म देऊ इच्छिते. लग्नानंतर कदाचित मी कामही करणार नाही’ असं उत्तर दिलं होतं.

(वाचा -  Deol कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलिवूडसाठी सज्ज, Dharmendra यांनी photo share करत मागितले आशीर्वाद )

11 जानेवारीला मुलगी झाल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघंही आई वडीलांच्या भूमिकेत आले आहेत. अनुष्काला मे महिन्यापासून कामावर रुजू व्हायचं होतं. मात्र एक महिन्यापूर्वीच तिने शूटींगला सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांकडून अनुष्काला ट्रोल केलं जात असून, जुन्या विधानांचा संदर्भ देत प्रश्न विचारले जात  आहेत. काहींनी तर सल्लेही दिले आहेत. शेवटी अनुष्का या प्रश्नांना उत्तरही देणार नाही हे तितकंच खरं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या