मुंबई, 31 मार्च: बॉलिवूडवर गेली पाच दशकं अधिराज्य गाजवलेल्या देओल कुटुंबातील आणखी एक सदस्य रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांनी आपला नातू आणि सनी देओलचा (Sunny Deol) मुलगा राजवीर (Rajveer Deol) याचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. सनी देओल यांनीही राजवीर चित्रपटासाठी सज्ज असल्याचं सोशल मीडियाद्वारे जाहीर केलं आहे. ‘माझा नातू राजवीर देओल हा अवनीश बडजात्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. माझी आपल्या सर्वांना प्रार्थना आहे की, जे प्रेम तुम्ही मला दिलंत ते प्रेम तुम्ही यांनाही द्याल. गुडलक आणि गॉड ब्लेस’ असं कॅप्शन अभिनेता धर्मेंद्र यांनी फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर दिलं आहे.
यापूर्वी सनी देओल यांचा मोठा मुलगा करण देओल यांनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करणने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल यांनी खूप मेहनत घेतली होती. मात्र हा चित्रपट अक्षरश: आपटला. करणनं सनी देओल यांच्या ‘यमला पगला दीवाना 2’मध्ये दिलजीत दोसांझसोबत एक रॅप साँग केलं आहे. मात्र त्यांचा लहान मुलगा राजवीर लाइमलाइटपासून लांबच होता. आता तोही रुपेरी पडद्यावर कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. याबाबतची माहिती सनी देओल यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
My son Rajveer starts his journey as an actor.Rajshri Productions proudly announces the collaboration of Rajveer Deol and Avnish Barjatya in a coming -of-age love story.A beautiful journey awaits ahead. pic.twitter.com/xBXfOR8c6R
— Sunny Deol (@iamsunnydeol) March 31, 2021
‘माझा मुलगा राजवीर एक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये सुरुवात करत आहे. राजश्री प्रोडक्शनच्या रोमँटीक लव्ह स्टोरी असलेल्या चित्रपटात राजवीर झळकणार आहे. त्याच्या नव्या प्रवासाबाबत आम्हाला उत्सुकता आहे’ अशी माहिती सनी देओल यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
(वाचा - Karan Johar सैफ अली खानच्या मुलाला करतोय लॉन्च; या चित्रपटाद्वारे करणार पदार्पण )
बॉलिवूडवर कायम नेपोटीझमचा आरोप केला जातो. त्याचबरोबर अभिनेत्यांच्या मुलांवर पहिल्या चित्रपटात चांगली कामगिरी करण्याचं दडपणही असतं. अशात राजवीर आपली जादू रुपेरी पडद्यावर दाखवून प्रेक्षकांची मनं जिंकणार का? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.