आलिया भट आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये फेस रोलरला महत्त्व देते.
मुंबई 15 मार्च**:** आलिया भट्ट ही (Alia Bhatt) बॉलिवूडमधील सध्याची आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आलियाचा आज वाढदिवस आहे. 28व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आलियाचा जन्म 1993 साली मुंबईत झाला होता. तिचे वडिल महेश भट्ट हे निर्माता असल्यामुळं लहानपणापासूनच घरात चित्रपट मनोरंजनाचं वातावरण होतं. परिणामी तिला देखील अभिनयाची गोडी लागली. आलियानं वयाच्या 20 व्या स्टुडंट ऑफ द ईयर (Student of the Year) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली. हे तर सर्वांनाच माहित आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल खरं तर स्टुडंट ऑफ ईयर या चित्रपटापूर्वीच तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अवश्य पाहा - अकराव्या वर्षीच आलियाला जडलं रणबीरवर प्रेम, वाचा कपलची Love Story आलियाला अभिनयाची प्रचंड आवड होती. चित्रपटात काम करण्यासाठी तिनं चक्क शाळा देखील सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर तिच्या हट्ट्ला वैतागून महेश भट्ट यांनी तिला संघर्ष (Sangharsh) या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यावेळी आलिया केवळ सहा वर्षांची होती. बालकलाकार म्हणून झळकेल्या अभिनेत्रीनं या चित्रपटात रीत ओबेरॉय ही भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आणि प्रिती झिंटा यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. परंतु त्यावेळी सेटवर केली जाणारी मेहनत पाहून आलियाला कळलं चित्रपटात काम करणं किती कठीण असतं. प्रत्येक विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर आलियानं प्रथम शिक्षण पुर्ण करुन मगच चित्रपटात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. अन् आज ती बॉलिवूडमधील आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आलियानं स्टुडंट ऑफ द ईयर या सुपरहिट चित्रपटानंतर हायवे, 2 स्टेट्स, गोइंग होम, कपूर अँड सन्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. उडता पंजाब, राझी आणि गल्ली बॉय या चित्रपटांमध्ये तिनं केलेला अभिनय पाहून समिक्षकांनी देखील तिची स्तुती केली. या चित्रपटानंतर आलियावर घराणेशाहीवरुन होणारी टीका काहीशी कमी झाली. सध्या आलिया चित्रपटांसोबतच रणबीर कपूरसोबत असलेल्या नात्यामुळं देखील चर्चेत असते.