मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt Birthday : अकराव्या वर्षीच आलियाला जडलं रणबीरवर प्रेम, वाचा कपलची Love Story

Alia Bhatt Birthday : अकराव्या वर्षीच आलियाला जडलं रणबीरवर प्रेम, वाचा कपलची Love Story

आलियानं (Alia Bhatt) म्हटलं होतं, की तिला रणबीर (Ranbir Kapoor) तेव्हापासून आवडायचा जेव्हा ती अकरा वर्षाची होती. आलियानं रणबीरला ‘ब्लॅक’ सिनेमाच्या सेटवर पाहिलं होतं.

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 15 मार्च : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही बॉलिवूडमधील सतत चर्चेत असणारी जोडी आहे. यांना सर्वाधिक रोमॅन्टिक कपल म्हणूनही ओळखलं जातं. रिअल लाईफमध्ये चाहत्यांच्या भलतीच पसंतीस उतरणारी ही जोडी लवकरच मोठ्या पडद्यावरही एकत्र झळकणार आहे. या दोघांनीही आपलं नातं आता सगळ्यांसमोर उघडही केलं आहे. अनेकदा दोघांच्या लग्नाच्या चर्चाही ऐकायला मिळतात. अशात आज अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt Birthday) वाढदिवस आहे. याच निमित्तानं जाणून घेऊ, या दोघांच्या प्रेम कथेला (Love Story of Alia And Ranbir) सुरुवात नेमकी कशी झाली. आलियानं 2013 मध्ये कॉफी विथ करणच्या एका भागात म्हटलं होतं, की तिला रणबीर तेव्हापासून आवडायचा जेव्हा ती अकरा वर्षाची होती. आलियानं रणबीरला ‘ब्लॅक’ सिनेमाच्या सेटवर पाहिलं होतं. यावेळी रणबीर संजय लिला भन्साळी यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. आलिया आणि रणबीरची प्रेमकथा 2018 मध्ये ब्रह्मास्त्रच्या सेटवर सुरू झाली. याआधी अभिनेता कॅटरिना कैफला (Katrina Kaif) डेट करत होता. दोघंही पहिल्यांदा एक कपल म्हणून सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) लग्नात एकत्र आले होते. यानंतर अनेकदा हे कपल एकमेकांसोबत फिरताना दिसलं. नुकतंच आलिया आणि रणबीरनं नवीन वर्षाचं स्वागतही आपल्या संपूर्ण कुटुंबासह केलं. 2019 मध्ये फिल्म फेअर अॅवॉर्ड शोमध्ये आलिया आणि रणबीरनं सर्वांसमोर मान्य केलं की दोघंही एकमेकांवर प्रेम करताना. आलियाला जेव्हा अॅवॉर्ड मिळाला तेव्हा बोलताना तिनं रणबीरला आय लव्ह यू म्हटलं. अनेकदा आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाच्या चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. मात्र, कपलनं याबद्दल अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही.
First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Cute couple, Ranbir kapoor

पुढील बातम्या