JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडमध्ये पुन्हा COVID-19चा शिरकाव, रणबीर कपूरनंतर संजय लीला भंसाळी पॉझिटिव्ह

बॉलिवूडमध्ये पुन्हा COVID-19चा शिरकाव, रणबीर कपूरनंतर संजय लीला भंसाळी पॉझिटिव्ह

Sanjay Leela Bhansali Corona Positive: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी (Director Sanjay leela Bhansali) यांनाही कोरोनाची लागण (Corona report positive) झाल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 मार्च: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये कोरोना पुन्हा एकदा शिरकाव करत असल्याचं दिसत आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाळी (Director Sanjay leela Bhansali) यांनाही कोरोना विषाणूची लागण (Corona report positive) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं चित्रीकरण मध्येच थांबवण्यात आलं आहे. यापूर्वी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं चित्रीकरण लाबंल होतं. यानंतर या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे या चित्रपटाची शूटिंग पुर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या मुंबईतील फिल्मसिटीत सुरू आहे. रणबीर कपूरची गर्लफ्रेन्ड अलिया भट्ट ही ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार नेमका कुठून झाला झाला, याची चर्चाही बॉलीवूडमध्ये दबक्या आवाजात केली जात आहे. नीतू कपूर यांनी आज सकाळी रणबीर कपूरला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती दिली होती. सध्या रणबीरवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याची माहितीही नीतू कपूर यांनी दिली आहे. नीतू यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करुन रणबीरला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, तर अनेकांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. हे वाचा- Ranbir Kapoor: अभिनेत्याचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह, नीतू कपूर यांनी दिली माहिती रणबीरच्याआधी नीतू कपूर यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नीतू जुग जुग जियो या सिनेमाच्या सेटवरच कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या याच दरम्यान अभिनेता वरुण धवनही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. वरुणशिवाय अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, मलायका अरोरा या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान रणबीरच्या तब्येतीबद्दल विचारपूस करताना रणधीर यांनी तो आजारी असल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते, की रणबीरची तब्येत ठीक नाही. मात्र, त्याला कोरोना झाला आहे, की नाही हे माहिती नाही. ते पुढे म्हणाले, की मी सध्या शहराच्या बाहेर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या