मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Ranbir Kapoor: अभिनेत्याचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह, नीतू कपूर यांनी दिली माहिती

Ranbir Kapoor: अभिनेत्याचा अहवाल आला कोरोना पॉझिटिव्ह, नीतू कपूर यांनी दिली माहिती

रणबीरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Ranbir Kapoor Tested Corona Positive) आला आहे. नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवरुन (Neetu Kapoor Instagram Post) याबाबतची माहिती दिली आहे.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 09 मार्च : अभिनेता रणबीर कपूरची तब्येत ठीक नसल्याचं वृत्त समोर येत होतं. रणधीर यांनीही अभिनेता आजारी असल्याची माहिती दिली होती. मात्र, रणबीरच्या कोरोना रिपोर्टबद्दल त्यांनी खुलासा केला नव्हता. अशात आता स्वतः नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवरुन (Neetu Kapoor Instagram Post) याबाबतची माहिती दिली आहे. रणबीरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Ranbir Kapoor Tested Corona Positive) आला असून तो सध्या होम क्वारंटाईन असल्याचं नीतू यांनी सांगितलं आहे.

नीतू कपूर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन रणबीरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये नीतू यांनी लिहिलं आहे, की आपल्या काळजीसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. रणबीरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्याच्यावर औषधोपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक आहे. तो सध्या होम क्वारंटाईन आहे आणि संपूर्ण काळजी घेत आहे. नीतू यांच्या या पोस्टवर कमेंट करुन चाहत्यांनी रणबीरला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.

रणबीरच्याआधी नीतू कपूर यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नीतू जुग जुग जियो या सिनेमाच्या सेटवरच कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या याच दरम्यान अभिनेता वरुण धवनही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. वरुणशिवाय अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अर्जून कपूर, मलायका अरोरा या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान रणबीरच्या तब्येतीबद्दल विचारपूस करताना रणधीर यांनी तो आजारी असल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते, की रणबीरची तब्येत ठीक नाही. मात्र, त्याला कोरोना झाला आहे, की नाही हे माहिती नाही. ते पुढे म्हणाले, की मी सध्या शहराच्या बाहेर आहे.

First published:

Tags: Corona, Ranbir kapoor