JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोनावर मात करण्यासाठी नम्रता शिरोडकरचा ‘हा’ सल्ला नक्की पहा

कोरोनावर मात करण्यासाठी नम्रता शिरोडकरचा ‘हा’ सल्ला नक्की पहा

सध्याच्या कोरोनाच्या बिकट (corona pandemic) परिस्थितीत प्रत्येकजन स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच नम्रता ने तंदुरुस्त राहण्यासाठी चाहत्यांना विशेष सल्ला दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 26 एप्रिल : अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) चित्रपटसृष्टीपासून अनेक वर्षे दूर आहे. पण आजही नम्रताचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सध्याच्या कोरोनाच्या बिकट (corona pandemic) परिस्थितीत प्रत्येकजन स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच नम्रताने तंदुरुस्त राहण्यासाठी चाहत्यांना विशेष सल्ला दिला आहे. कोरोनापासून लवकर बरं होण्यासाठी तिने नियमित व्यायामाचा (regular exercise)  सल्ला दिला आहे. नम्रताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. जीममध्ये व्यायाम करत हा फोटो तिने क्लिक केला होता. तर पोस्टला कॅप्शन देत तिने लिहीलं होतं, ‘व्यायाम हा खूपच आव्हानात्मक आहे… विशेषता जेव्हा तुम्ही तो एका मोठ्या विश्रांतीनंतर करता, पण असं म्हटलं जात की नियमित व्यायाम तुम्हाला कोरोनापासून दूर ठेऊ शकतो आणि जरी झालाच तरी त्यातून लवकर बरं होण्यास मदत होते. तंदुरुस्त रहा, सुरक्षित रहा.’

नम्रता सोशल मीडियावर नेहमीच निरनिराळे फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. त्याच प्रमाणे तिच्या मुलांचे फोटो शेअर करते. नम्रता सध्या सिनेसृष्टीपासून लांब असून कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.

संबंधित बातम्या

तिने ‘हिरो हिंदुस्तानी’ (Hero Hindustani), ‘वास्तव : द रियॅलिटी’ (Vastaav : The reality) , ‘ब्राइड आणि प्रिजस्टिस’ (bride and prejustice)  यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांत कां केल आहे.

अंकिता लोखंडे करणार विवेक ओबेरॉयसोबत रोमान्स; केली नव्या चित्रपटाची घोषणा

2005 साली तिने साउथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याच्याशी विवाह केला. तर त्यांना गौतम आणि सितारा नावाची दोन मुलं देखिल आहेत. गौतम आणि सितारा हे देखिल सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहेत. तर आतापासूनच त्यांचे चाहते निर्माण झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या