मुंबई 25 एप्रिल : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आता बॉलिवूड मध्येही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) ‘मनिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ (Manikarnika : the queen of Jhansi) या चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होत. त्यात तिने ‘झलकरीबाई’ हे ऐतिहासिक पात्र साकारलं होतं. तर त्यानंतर ती ‘बागी 3’ (Baaghi) या चित्रपटात दिसली होती. तर आता ती एका नव्या चित्रपटात दिसणार आहे.
एका बेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अंकिता विवेक ऑबेरॉय च्या ‘इती’ (Iti) या चित्रपटात दिसणार आहे. हा एक मर्डर मिस्त्री (murder mistery) चित्रपट असून अभिनेता ‘विवेक ऑबेरॉय’ (Vivek Oberoi) चित्रपटाची निर्मिती करत आहे.
तापसीची खिल्ली उडवणं आलं कंगनाच्या अंगाशी; ‘त्या’ शब्दामुळं होतेय ट्रोल
विशेष म्हणजे अंकिता या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे अंकित्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच पर्वणी ठरणार आहे. याआधी अंकिता सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती.
View this post on Instagram
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अंकिता चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. ही एक मर्डर मिस्त्री असून प्रेरणा अरोरा यांनी मागील वर्षी चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची कथा ही एक मुलगी स्वताच्याच खुनाचा शोध घेत आहे. निर्माते चांगल्या अभिनेत्रीच्या शोधात होते. तेव्हा त्यांनी अंकिताशी संपर्क साधला. अंकितालाही भूमिका आवडली आहे. या महिन्यात शिमल्यात चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ते पुढे ढकलण्यात आलं आहे’.
View this post on Instagram
दिग्दर्शक विशाल रंजन मिश्रा हे चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून अभिनेता विवेक ऑबेरॉय, ताहीर शाबिर आणि राजीव सेन हे ही चित्रपटात दिसणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.