मुंबई 23 एप्रिल : कोरोनाची बिकट परिस्थिती (corona pandemic) ही आणखीनच खालावत चालली आहे. रोज रुग्णांचे (corona patients) आकडे वाढत आहेत. याशिवाय अनेक दुर्घटनाही घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन गळतीमुळे 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर नुकतंच विरार शहरात कोविड हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तर अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सातत्याने या कठीण काळात लोकांची मदत करत आहे. तसेच ट्वीट करून इतरांनाही मदत करण्याची प्रेरणा देत आहे. सोनूने आता नवं ट्विट करत (Sonu Sood tweeted) चाहत्यांच्या मनातील देशभक्ती जागी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे. ‘15 ऑगस्टला देशभक्ती दाखवणाऱ्यांसाठी संदेश … देशासाठी काही करण्याची आणि देशभक्ती दाखवण्याची याहून चांगली संधी कधीच येणार नाही’. यासोबतच तिरंगा आणि हात जोडण्याचे इमोजी त्याने शेअर केले आहेत. फक्त एक दिवस देशभक्ती (patriotism) दाखवून काहीच होणार नाही. तर आता खरी देशभक्ती दाखवायची वेळ आली असल्याचं तो या ट्विटमधून म्हणत आहे.
सोनू मागील काही दिवसांपासून सातत्याने असे ट्वीट करत आहे व त्याच्या चाहत्यांनाही इतरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. सोनू स्वत: कोरोना संक्रमित (corona positive) आहे. पण तरीही त्याचं मदतकार्य सुरूच आहे.
सोनू सूद फाउंडेशन (sonu sood foundation) या त्याच्या संस्थेमार्फत तो अनेकांची मदत करत आहे. ट्विटच्या माध्यमातून तो ही माहिती देतो.
‘मलायकाने सांगितलेल्या या व्यायामामुळे मी केली कोरोनावर मात’; VIDEO शेअर करून वरुण धवनने सांगितला उपायसध्या कोरोना रुग्णांना बेड्स, औषध तसेच ऑक्सिजन यांची नितांत गरज आहे.तर या सगळ्या गोष्टी अपुऱ्या पडत आहेत. सोनूने अनेक रुग्णांना या गोष्टी मिळवून देण्यासही मदत केली आहे.