Home /News /entertainment /

'मलायकाने सांगितलेल्या या व्यायामामुळे मी केली कोरोनावर मात'; VIDEO शेअर करून वरुण धवनने सांगितला उपाय

'मलायकाने सांगितलेल्या या व्यायामामुळे मी केली कोरोनावर मात'; VIDEO शेअर करून वरुण धवनने सांगितला उपाय

‘हा तोच व्यायाम प्रकार आहे जो मी कोरोना संक्रमित असताना नियमित करत होतो. हा खूपच उपयोगी आहे’. वरुण धवनने आपण कोरोनावर कशी मात केली हे सांगताना हा मलायकाचा VIDEO शेअर केला आहे.

  मुंबई, 23 एप्रिल : बॉलिवूड (bollywood) अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan)  काही दिवसांपूर्वीच कोरोना संक्रमित (corona positive) झाला होता. त्याने सोशल मीडियाच्या माध्यामातून ही बातमी शेअर केली होती. आता तो कोरोना मुक्त झाला आहे. पण कोरोनाशी आपण कसा लढा दिला (Corona fight of varun Dhawan) हे त्याने आता सांगितलं आहे. त्याने एका श्वसनासंबधी व्यायाम प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर याच व्यायामप्रकारानेच आपल्याला कोरोनावर मात करता आली असंही त्याने म्हटलं आहे. वरुण ने अभिनेत्री आणि फिटनेस (fitness)  साठी प्रसिद्ध असलेली मलायका अरोराचा (Malaika Arora) ब्रिथिंग एक्सरसाइज (Breathing exercise) व्हिडीओ शेअर केला आहे. तर कॅप्शन मध्ये लिहिलं आहे, ‘हा तोच व्यायाम प्रकार आहे जो मी कोरोना संक्रमित असताना नियमित करत होतो. हा खूपच उपयोगी आहे’. (Varun Dhawan shares his corona positive experience) वरुण धवन मागील वर्षी डिसेंबर मध्ये कोरोना संक्रमित झाला होता. त्यावेळी वरुण चंदीगढ मध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’चं (Jug jig jiyo) शुटींग करत होता.
  वरुण कमी काळातच कोरोनावर मात केली होती. आणि इतरांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय लवकरच वरुणचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी जगभरातील त्याच्या चाहत्यांनी वृक्षारोपण करून त्याला वाढदिवसाची भेट दिली आहे. वरुण ने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहीती दिली.

  हे वाचा - कार्तिक आर्यनला डच्चू; आता खिलाडी अक्षय कुमारसोबत करण जोहरचा Dostana 2?

  याशिवाय वरुण ‘भेडीया’ (Bhedia)  या चित्रपटात देखील दिसणार आहे. नुकतंच वरुणने अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon)  सोबत या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं आहे. ते शुटींग पूर्ण करून दोघे मुंबईत परतले आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood News, Coronavirus, Malaika arora, Varun Dhawan

  पुढील बातम्या