JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनंतर 'गुरुनाथ' दिसणार 'या' मालिकेत

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेनंतर 'गुरुनाथ' दिसणार 'या' मालिकेत

हिंदी टेलिव्हिजन विश्वात क्राईम पेट्रोल (Crime Petrol) ही मालिका विशेष लोकप्रिय ठरलेली आहे. अभिजीत खांडकेकर (Abhijit Khandkekar) याची नवी मालिका याच्याशीच निगडित आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 मार्च : मराठी टेलिव्हिजन चा लोकप्रिय चेहरा अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) एका नव्या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिजीत काम करत असलेली तसेच झी मराठी (Zee Marathi)  ची लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya navryachi bayko) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. दीर्घकाळ ही मालिका प्रेक्षकांच मनोरंजन करत होती तर अभिजीत चं गुरूनाथ हे पात्र विशेष गाजलं होत. यानंतर अभिजीत पुन्हा एकदा नव्या रूपात येण्यास सज्ज झाला आहे. यावेळी तो नायक म्हणून नव्हे तर सूत्रसंचालक (Host) म्हणून दिसणार आहे. हिंदी टेलिव्हिजन विश्वात क्राईम पेट्रोल (Crime Petrol) ही मालिका विशेष लोकप्रिय ठरलेली आहे. त्यावरच आधारीत मालिका मराठीत लवकच येत आहे. ‘क्रिमिनल्स……..चाहूल गुन्हेगारांची’ (Criminals….chahul gunhegarnchi) असं या मालिकेचं नाव असून लवकरच मालिकेच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. अभिजीत खांडकेकर या मालिकेच सूत्रसंचालन करणार. सोनी टिव्ही वरील या मालिकेचे गेले अनेक वर्षे अभिनेता अनूप सोनी हा सूत्रसंचालन करत होता. तर मराठीत आता अभिजीत ही भूमिका स्विकारत आहे.

वाचा -  ‘आई माझी काळूबाई’ मालिकेत चक्क तिसऱ्यांदा बदलली ‘आर्या’, या अभिनेत्रीची लागली वर्णी

संबंधित बातम्या

अभिजीत अभिनयाव्यतिरिक्त एक आरजे आहे. रेडीयो जॉकी म्हणूनच त्याने आपल्या करिअर ला सुरूवात केली होती. याचबरोबर तो उत्तम निवेदकही आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यांत त्याने सूत्रसंचालन केलं आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण या रियॅलिटी शो मधे तो स्पर्धक म्हणून दिसला होता. 2010 साली आलेली ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ (Maziya priyala preet kalena) या झी मराठी वरील मालिकेतून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं होत. अभिजीत आणि अभिनेत्री मृणाल दुसानीस यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. त्यानंतर अभिजीत माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्याच मालिकेत तो पुन्हा दिसून आला. अनिता दाते- केळकर, रसिका सुनिल आणि अभिजीत खांडकेकर हे मुख्य कलाकार मालिकेत होते. दिर्घकाळ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. तर मालिकेला प्रचंड लोकप्रियताही मिळाली होती. काहीच दिवसांपूर्वी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या