प्राजक्तानंतर या मालिकेमध्ये वर्णी लागली अभिनेत्री वीणा जगतापची. गेली काही महिने वीणा या मालिकेमध्ये ‘आर्या’ ची भूमिका साकारत आहे. मात्र वीणाने सुद्धा या मालिकेला रामराम ठोकल्याची माहिती नुकताच समोर आली आहे. चित्रिकरणादरम्यान वीणा सतत आजारी पडत आहे. तिची तब्येत ठीक नसल्यानं ती मालिका सोडत असल्याचं सांगण्यात येतं आहे. बिग बॉस मराठीमुळे वीणा बरीच चर्चेत आली होती. यामध्ये ती प्रतिस्पर्धी असणाऱ्या शिव ठाकरेच्या प्रेमात पडली होती. यादोघांनी कार्यक्रमामध्ये आपलं नातं मान्यसुद्धा केलं होतं.View this post on Instagram
वीणा जगताप नंतर आता या मालिकेत वर्णी लागली आहे अभिनेत्री रश्मी अनपट हिची. रश्मी आत्ता मालिकेत ‘आर्या’ हे मुख्य पात्र साकारणार आहे. यापूर्वी रश्मी झी युवावरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेत झळकली होती. रश्मीनं ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. रश्मी मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये सुद्धा झळकली आहे. तसेच रश्मीने सुवासिनी आणि पुढचा पावली यांसारख्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका सुद्धा साकारली आहे.तिनं ‘अग्निहोत्र 2’ या मालिकेमध्येसुद्धा अभिनय केला आहे. (हे वाचा:रावरंभा: मराठी इतिहासातील आणखी एक योद्धा येणार मोठ्या पडद्यावर) रश्मी ही मूळची पुण्याची आहे. रश्मीनं अमित खेडेकर याच्याशी विवाह केला आहे. रश्मीचं फक्त लग्नच नाही झालं तर ती एका गोंडस बाळाची आईसुद्धा आहे. आत्ता रश्मीला चाहते आर्याच्या भूमिकेत किती दाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.