मुंबई 14 मार्च: आमिर खानला (Aamir Khan) बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हणतात. कारण तो आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड मेहनत करतो. गजनी या चित्रपटासाठी त्यानं वेड्यांच्या इस्पितळात जाऊन तेथील रुग्णांवर अभ्यास केला होता. दंगल या चित्रपटासाठी त्यानं तब्बल 32 किलो वजन वाढवून नंतर ते कमी केलं होतं. असाच काहीसा थक्क करणारा प्रकार त्यानं रंगीला या चित्रपटाच्या वेळी केला होता. आमिर या चित्रपटाच्या बाबतीत इतका सीरिअस होता की त्यावेळी तो एक-एक आठवडा आंघोळ देखील करायचा नाही. (Aamir Khan don’t have bath for days) 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ (Rangeela) या सुपरहिट चित्रपटाला अलिकडेच 25 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमिरनं चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळचे काही गंमतीशीर किस्से सांगितले. तो म्हणाला, “मी रंगीलामध्ये मुन्ना नावाच्या एका टपोरी तरुणाची भूमिका साकारली होती. हा व्यक्ती चित्रपटांच्या तिकिटांचा काळा बाजार करतो. एका मवालीगिरी करणाऱ्या तरुणाच्या भूमिकेत पूर्णपणे गुंतून जाण्यासाठी त्याच्यासारखं वागण्याचा निर्णय मी घेतला. कारण त्या व्यक्तिरेखेचा फिल मला येत नव्हता. त्यानंतर मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातही त्याच्यासारखा बोलायचो. अगदी आठ-आठ दिवस आंघोळी देखील केली नाही. त्यानंतर मला ती व्यक्तिरेखा सापडली. खर तर या माझ्या या वाईट सवयींमुळं अनेकदा मला कुटुंबीयांचा ओरडा पडतो. पण हिच माझ्या कामाची शैली आहे. मी काय करु…” असा थक्क करणारा अनुभव आमिर खानने सांगितला. अवश्य पाहा - पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेत्रीनं भर स्टेजवर काढले कपडे, वाचा काय आहे कारण…
‘रंगीला’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं. आजवर त्यांनी ‘शिवा’, ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘सरकार’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रटांची निर्मिती केली आहे. परंतु ‘रंगीला’ हा त्यांचा मास्टरपिस चित्रपट होता असं म्हटलं जातं. केवळ तीन कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं 25 वर्षांपूर्वी जवळपास 44 कोटी रुपये इतकी कमाई केली होती. ए.आर. रेहमान यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी रचलेली गाणी आजही रसिकांमध्ये चर्चेत असतात.