पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेत्रीनं भर स्टेजवर काढले कपडे, वाचा काय आहे कारण

पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेत्रीनं भर स्टेजवर काढले कपडे, वाचा काय आहे कारण

फ्रान्सच्या 57 वर्षांच्या अभिनेत्री कोरेन मासिरो (Corrine Masiero) सरकारच्या एका निर्णयाचा विरोध करण्यासाठी स्टेजवरच स्वत:चे कपडे काढले.

  • Share this:

पॅरीस, 14 मार्च :  आपला विरोध दाखवण्यासाठी जगभरात लोकं वेगवेगळे उपाय करतात. मात्र फ्रान्स (France) मधील एका अभिनेत्रीनं विरोध करण्यासाठी जो मार्ग अवलंबला त्यामुळे सर्व जण थक्क झाले. फ्रान्सच्या 57 वर्षांच्या अभिनेत्री कोरेन मासिरो (Corrine Masiero) सरकारच्या एका निर्णयाचा विरोध करण्यासाठी स्टेजवरच स्वत:चे कपडे काढले. सीझर अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमात हा प्रकार घडला. हा पुरस्कार फ्रान्समध्ये ऑस्करच्या दर्जाचा मानला जातो.

फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे (COVID-19) मुळे टॉकीज आणि नाट्यगृह गेल्या 3 महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे अनेक कलाकार त्रस्त आहेत.  सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मासिरो यांना उत्तम पोशाख (best costume) पुरस्कारासाठी स्टेजवर निमंत्रण दिले. त्यावेळी त्यांनी गाढवाचा पोशाख परिधान केला होता.

कार्यक्रमाच्या मुख्य स्टेजवर जाताच त्यांनी सर्व कपडे काढून टाकले. त्यांची ही कृती बघून सर्व थक्क झाले. मासिरो यांनी त्यांच्या शरिरावर 'कल्चर नाही तर भविष्य नाही', असा खास संदेश देखील सरकारसाठी लिहिला होता.  त्याचबरोबर आमची कला आम्हाला परत द्या अशी मागणी करणारा मेसेज देखील त्यांनी फ्रान्सच्या पंतप्रधानांसाठी लिहला होता. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही कलाकारांनी देखील सरकारला ही मागणी केली होती. फ्रान्समधील स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी डिसेंबरपासून टॉकीज बंद आहेत.

(हे वाचा : ‘का बिचारीला बदनाम करताय?’ ब्रिटनच्या राणीला ट्रोल करणाऱ्यांवर कंगना संतापली )

डिसेंबरमध्ये फ्रान्सचे शेकडो कलाकार, चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार यांच्यासह इंडस्ट्रीतील अन्य मंडळींनी पॅरीसमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. सरकारने ज्या पद्धतीनं अन्य जागांवरील बंदी काढली त्याच पद्धतीने कला केंद्रावरील बंदी देखील रद्द करण्यात यावी अशी या कलाकारांची मागणी आहे.

Published by: News18 Desk
First published: March 14, 2021, 8:52 AM IST

ताज्या बातम्या