1990 च्या दशकातल्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये उर्मिला मातोंडकरचं (Urmila Matondkar) नाव घेतलं जातं. तिने एकापेक्षा एक हिट चित्रपटांत काम केलंय. तिने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केलंय. उर्मिला तिच्या विविधांगी भूमिकांसाठी ओळखली जाते. तिचा डान्स आणि अभिनयाचा खास चाहता वर्ग आहे. तिला अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उर्मिला सध्या राजकारणात सक्रिय आहे.
उर्मिलाचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत मराठी कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचं नाव श्रीकांत आणि आईचं नाव सुनीता. तिचं शालेय शिक्षण मुंबईत झालं आणि तिने पुणे विद्यापीठातून कला शाखेत पद