JOIN US
मराठी बातम्या / क्राइम / भूक लागली म्हणून ऑनलाइन ऑर्डर केली, पार्सल घ्यायला दार उघडलं आणि....

भूक लागली म्हणून ऑनलाइन ऑर्डर केली, पार्सल घ्यायला दार उघडलं आणि....

अतिथी देवो भव: सावधान! जरा थांबा. तुमच्यात खूप माणुसकी असेल पण समोरचा माणूस हैवान तर नाही ना हे तरी आधी तपासून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हरिकांत शर्मा, प्रतिनिधी आग्रा, 7 जून : चमचमीत जेवण ऑर्डर केलंय. कधी येतंय असं झालंय. दहा मिनिटं…पाच मिनिटं…दोन मिनिटं…दहा सेकंद…डिंग डाँग. घराची बेल वाजली. समोर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय हजर. जरा पाणी मिळेल का? विचारतोय. आधी जेवण घेऊ की पाणी आणू? मी विचारात. पाणी द्यायलाय हवं…अतिथी देवो भव: सावधान! जरा थांबा. तुमच्यात खूप माणुसकी असेल पण समोरचा माणूस हैवान तर नाही ना हे तरी आधी तपासून घ्या. आग्रा सिकंदरा पोलिसांनी अशाच हैवानांची एक टोळी ताब्यात घेतलीये. जे झोमॅटोचा बनावट डिलिव्हरी बॉय बनून यायचे, घरावर पाळत ठेवायचे आणि घरातले दागिने, रक्कम गायब करायचे. तुमच्यासोबतही हा प्रकार होऊ नये म्हणून सतर्क राहा. उत्तर प्रदेशच्या आग्र्यात घडलेली ही चोरीची प्रकरणं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्यानंतर पोलिसांनी सहाजणांना तुरुंगात धाडलं. त्यापैकी तिघं अल्पवयीन आहेत. हे 6 भामटे मिळून लोकांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने चोरायचे आणि सोनाराला विकायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह काही रक्कमही जप्त केली आहे. शिवाय चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोन सोनारांनाही अटक केली आहे.

हे चोर इतक्या सफाईदारपणे चोरी करायचे की कोणाला त्यांच्यावर संशयही यायचा नाही. दिवसाढवळ्या, संध्याकाळच्या सुमारास ते झोमॅटोचे कपडे घालून लोकांच्या घराबाहेर घुटमळायचे. लोकांना वाटायचं ते आपल्या परिसरात डिलिव्हरी द्यायला आले असतील. परंतु सत्य काहीतरी वेगळंच होतं. ते त्यांच्या घराचं निरीक्षण करायला यायचे. घरात किती वाजता कोण येतं, घरात किती माणसं राहतात, त्यांचं राहणीमान कसं आहे, घर किती वाजता बंद असतं, परिसरात कुठे-कुठे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे, या सगळ्या गोष्टी ते व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि संधी मिळताच हात मारायचे. एखादं घर रिकामं मिळतंच नसेल तर तिथे जाऊन घरमालकाला शब्दात अडकवून चोरी करून पसार व्हायचे. Palghar News : मला माफ करा मी तुमचे दागिने चोरले, इमोशनल चोराने 15 तोळं सोनं केलं परत चोरांचा हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्यानंतर पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आपल्यालाही कोणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या तर चोरीला बळी पडू नका. त्याबाबत पोलिसांना वेळीच माहिती द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या