#agra

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO 'ताजमहल' परिसरात 'चौकीदार चोर है' च्या कुणी दिल्या घोषणा?

देशDec 17, 2018

VIDEO 'ताजमहल' परिसरात 'चौकीदार चोर है' च्या कुणी दिल्या घोषणा?

आग्रा, 17 डिसेंबर : नेहमी शांत आणि पर्यटकांनी फुलून गेलेला 'ताजमहल'चा परिसर सोमवारी घोषणांनी दणाणून गेला. त्या घोषणा होत्या 'चौकीदार चोर है'. अचानक सुरू झालेल्या या घोषणाबाजींनी पर्यटकही गोंधळून गेले कारण याआधी असं कधीच झालं नव्हतं. काँग्रेसचे कार्यकर्ते ताज परिसरात आले. त्यांनी घोषणांचे फलक लपून आणले होते. परिसरात येताच त्यांनी फलक फडकवून पंतप्रधानांविरुद्ध 'चौकीदार चोर है' च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर जाग आलेल्या सुरक्षा दलाने त्या सर्वांना बाहेर काढलं. या आंदोलनामुळे मात्र ताज महालच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Live TV

News18 Lokmat
close