अमरावतीमधील उमेश कोल्हे या 54 वर्षांच्या केमिस्टची हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी भाजपामधील निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या बाजूनं पोस्ट लिहिली होती. याच कारणांमुळे कोल्हे यांची हत्या झाल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.