JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / लहान मुलांवर का अधिक होतोय ओमायक्रॉन व्हेरिएंटचा परिणाम? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

लहान मुलांवर का अधिक होतोय ओमायक्रॉन व्हेरिएंटचा परिणाम? तज्ज्ञांनी दिलं उत्तर

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचं कारण लसीकरणाची कमी आणि ओमायक्रॉनच्या प्रसाराची अधिक क्षमता हे आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 जानेवारी : अमेरिकेत कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron Variant) या नव्या व्हेरिएंटच्या विळख्यात सगळ्यात जास्त लहान मुलं आली आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुलांची संख्या (Child Hospitalization) झपाट्याने वाढत आहे. सीडीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये 672 लहान मुलं आहेत. लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार हा एक्सपर्टसाठीही चिंतेचा विषय ठरत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढण्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणाचा दर कमी असणं आणि दुसरं कारण म्हणजे ओमायक्रॉनचा वेगाने होणारा प्रसार. Omicron मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका! GDP ग्रोथमध्ये घट होण्याचा अंदाज जॉन हॉप्किन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्यूरिटीचे सिनिअर स्कॉलर डॉ. अमेश अदलेजा यांनी फोर्ब्सच्या आपल्या मुलाखतीत सांगितलं की कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या लहान मुलांची वाढणारी संख्या ही माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारी बाब नाही. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, लहान मुलांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचं कारण लसीकरणाची कमी आणि ओमायक्रॉनच्या प्रसाराची अधिक क्षमता हे आहे. अमेरिकेत आतापर्य़ंत 5-11 वर्षापर्य़ंतच्या 25 टक्के आणि 12-17 या वयोगटातील 64 टक्के मुलांनाच लस दिली गेली आहे. यासोबतच 5 वर्षापेक्षा लहान मुलांचं लसीकरण केलं गेलं नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आताच हे म्हणणं चुकीचं ठरेल की ओमायक्रॉन इतर कोरोना व्हेरिएंटच्या तुलनेत लहान मुलांमध्ये जास्त गंभीर लक्षणं निर्माण करेल. अमेरिका अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या अध्यक्ष ली सेवियो बियर्स यांनी सांगितलं की वॉशिंग्टन डीसीच्या ज्या रुग्णालयात त्या काम करतात, तिथे दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित मुलांमधील जवळपास अर्धी मुलं पाच वर्षापेक्षा कमी वयाची आहेत. N95 की KN95 कोरोनापासून बचावासाठी कोणता मास्क अधिक उत्तम? काय आहे फरक? अमेरिकेत न्यूयॉर्क शहर हे सर्वाधित कोरोना प्रभावित शहर आहे. इथे 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या काळात 18 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाचे जवळपास 109 मुलं रुग्णालयात दाखल झाली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या