मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

N95 की KN95 कोरोनापासून बचावासाठी कोणता मास्क अधिक उत्तम? काय आहे दोन्हींमधील फरक?

N95 की KN95 कोरोनापासून बचावासाठी कोणता मास्क अधिक उत्तम? काय आहे दोन्हींमधील फरक?

कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'मास्क' ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'मास्क' ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'मास्क' ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.

 मुंबई, 7 जानेवारी-   गेल्या दोन वर्षांपासून जगभरात सुरू असलेलं कोरोना महामारीचं  (Corona Pandemic)  संकट पुन्हा गडद होत आहे. सध्या कोरोना विषाणूच्या 'ओमायक्रॉन'  (Omicron)  या नवीन व्हॅरिएंटची दहशत पसरली आहे. ओमिक्रॉनबाबत जगभरातून भीतिदायक आकडेवारी समोर येऊ लागली आहे. भारतातही ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कोरोनाची लस घेतलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची स्थिती जास्त गंभीर होत नसली, तरी बहुतेकशा लशी  (Covid-19 Vaccine)   ओमायक्रॉनविरुद्ध जास्त प्रभावी ठरत नसल्याची बाब प्राथमिक संशोधनातून निदर्शनास आल्यानं चिंता वाढली आहे.

अशा स्थितीमध्ये मास्क (Mask) वापरणं, सॅनिटायझर वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं यांसारख्या सुरक्षा उपायांचं (Safety measures) पालन करण्याचे सल्ले वारंवार मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, कोरोनापासून बचाव करण्यासाठी 'मास्क' ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रामुख्यानं N95 मास्क   (N95 Mask)   वापरण्याची शिफारस केली जाते. N95 सोबतच बाजारामध्ये KN95 मास्कदेखील विकले जात आहेत. या दोन्ही मास्कमध्ये फरक आहे. तो जाणून घेणं गरजेचं आहे.

वाटीच्या आकारासारखे दिसणारे बहुतेक मास्क N95 कॅटेगरीमध्ये येतात, तर KN95 मास्क थोडे वेगळे असतात. सध्या बहुतेक व्यक्ती याच प्रकारचे मास्क वापरताना दिसत आहेत. गुणवत्तेच्या आधारावर दोन्ही मास्कची तुलना केली, तर दोन्हींमध्ये विशेष असा फरक नाही. दोन्ही मास्क हवेतले 0.3 मायक्रॉन आकाराचे कण रोखण्यास सक्षम आहेत. या व्यतिरिक्त दोन्हींचा एअर फ्लो रेटदेखील 85 L/min इतका आहे. एकूणच गुणवत्तेचा विचार केल्यास दोन्ही मास्क सारखेच आहेत. असं असलं, तरी अप्रूव्हल आणि कम्फर्टचा विचार केल्यास दोन्ही मास्कमध्ये थोडाफार फरक आहे.

N95 मास्कला अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थकडून (NIOSH) मान्यता मिळाली आहे. KN95 मास्कला एनआयओएसएचची मान्यता मिळालेली नाही; मात्र चीनसारख्या इतर अनेक देशांतल्या संस्थांनी KN95 मास्कला मान्यता दिली आहे. असं सांगितलं जात आहे, की अमेरिकेत मास्कला मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे. त्या प्रक्रियेमध्ये हा मास्क पास झालेला नाही. कम्फर्टचा (Comfort) विचार केल्यास, KN95 मास्क कॅरी करण्यास जास्त कम्फर्टेबल असल्याचं मत अनेक नागरिकांनी नोंदवलं आहे. KN95 च्या तुलनेत N95 मास्क जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवणं कठीण आहे.KN95 आणि N95 या दोन्ही मास्कची गुणवत्ता जवळपास सारखीच आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठला मास्क वापरायचा हे ठरवू शकता.

First published:

Tags: Coronavirus, Mask